Yoga asanas to increase concentration Sakal
आरोग्य

Yoga Benefits फोकस करण्यात अडथळे येताहेत? Concentration वाढवण्यासाठी करा ही योगासने

हल्ली लहान मुलांपासून ते प्रौढांमध्येही मन एकाग्र करण्याच्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. यावर उपाय म्हणून नियमित योगासनांचा सराव करावा.

Harshada Shirsekar

एखादी गोष्ट योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये मन गुंतवून काम करणे गरजेचं असते, हे आपण अनेकदा थोरामोठ्यांकडून ऐकले असेलच. मनावर नियंत्रण असेल तर आपण जीवनातील कित्येक मोठमोठ्या समस्यांवर सहजरित्या मात करू शकता. 

पण मन स्थिर नसेल, एकाग्र नसेल तर कामामध्ये फोकस करण्यात अडथळे निर्माण होतात. काही जण आपले महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी रात्र-रात्रभर जागरण करतात, पण यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. 

एकाग्रतेमध्ये अडथळे येत असतील तर यावर रामबाण उपाय म्हणजे योगासने. नियमित आसनांचा सराव केल्यास मनावर नियंत्रण मिळेलच शिवाय कित्येक शारीरिक-मानसिक लाभही मिळतील. एकाग्रता वाढवण्यासाठी कोणकोणत्या आसनांचा अभ्यास करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती… 

एकाग्रता वाढवण्यासाठी आसनांमुळे मदत कशी मिळू शकते? 

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी योगासने महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतात. कारण योगच्या माध्यमातून शरीर, श्वास आणि मेंदू एकत्रित जोडले जातात. योगासनांच्या अभ्यासामुळे शारीरिक व मानसिक ताणतणाव देखील कमी होण्यास मदत मिळते. 

ताडासन (Tadasana)

ताडासन (Tadasana)

ताडासनाचा सराव करताना श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करावे लागते. याचा सकारात्मक परिणाम मेंदूवरही होतो. या आसनामुळे तणावापासून मुक्तता मिळते आणि एकाग्रता वाढण्यासही मदत मिळू शकते.

सावधगिरी बाळगा - ताडासन करताना शरीर स्ट्रेच करावे लागते, यादरम्यान शारीरिक वेदना होऊ लागल्यास आसनाचा सराव करू नये. 

वृक्षासन (Vrikshasana)

वृक्षासन (Vrikshasana)

वृक्षासनाचा सराव करताना आपल्याला एक पायावर उभे राहावे लागते आणि संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे लागते. वृक्षासनाचा नियमित सराव केल्यास चिंता, तणावापासून मुक्तता मिळू शकते. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.

सावधगिरी बाळगा - डोके व पाय दुखत असल्यास हे आसन करू नये. 

गरुडासन (Garudasana)

गरुडासन (Garudasana)

तुमचे कोणत्याही कामात मन लागत नाहीय? तर मग नियमित गरूडासनाचा सराव करावा. यामुळे मनाची एकाग्रता वाढण्यास नक्कीच मदत मिळू शकते.

सावधगिरी बाळगा - शरीराच्या स्नायूंमध्ये सूज असल्यास, सांधेदुखीची समस्या असल्यास या आसनाचा सराव करणे टाळावे.

बकासन (Bakasana)

बकासन (Bakasana)

बकासनामुळे कोणतेही काम करताना त्यामध्ये एकाग्रता टिकून राहण्यास मदत मिळते. कारण या आसनामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे मेंदूवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. 

सावधगिरी बाळगा - हात दुखत असल्यास किंवा हाताशी संबंधित काही समस्या असल्यास बकासनाचा सराव करू नये, कारण यामुळे शारीरिक दुखापती होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT