Diabetes sakal
आरोग्य

Diabetes: मधुमेहींनी या गोष्टींपासून दूर रहावे… कसा असावा आहार जाणून घ्या…

तुम्हालाही मधुमेहाची समस्या असेल तर या काळात तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे ते जाणून घेणार आहोत.

Aishwarya Musale

आजकाल बैठी जीवनशैलीमुळे मधुमेहाची समस्या खूप वाढली आहे. तरुण वर्गही त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. आता एक गोष्ट निश्चित आहे की यावर कोणताही इलाज नाही, त्यामुळे तो आटोक्यात ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीसोबतच आरोग्यदायी आहाराचाही रूटीनमध्ये समावेश करणे गरजेचे आहे. आरोग्य तज्ज्ञ यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात झिंकचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया मधुमेह नियंत्रित करण्यासाठी झिंक का महत्त्वाचं आहे.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी झिंक महत्त्वाचे का आहे?

तज्ञ म्हणतात की आपले शरीर एक असे घर आहे जिथे अनेक विशेष खोल्या आहेत ज्यांचे कार्य भिन्न आहेत. यापैकी एक खोली म्हणजे स्वादुपिंड. स्वादुपिंडात कामगारांचे गट असतात ज्यांना आपण बीटा पेशी म्हणून ओळखतो. या बीटा पेशी इन्सुलिन तयार करण्याचे काम करतात.

त्याच वेळी, मधुमेह असलेल्या लोकांच्या शरीरात झिंक कमी असते आणि बीटा पेशींना कार्य करण्यासाठी झिंकची आवश्यकता असते. झिंकच्या कमतरतेमुळे ते इन्सुलिन तयार करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जे लोक यासाठी इंजेक्शन घेत आहेत त्यांनी झिंकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे इन्सुलिनचे उत्पादन सुधारते.

झिंकच्या सेवनाने चयापचय वाढतो आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते. झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात सीड्स, बदाम, कडधान्ये, ओट्स, चिकन ब्रेस्ट, भोपळ्याच्या बिया, क्विनोआ, पनीर यांचे सेवन करू शकतात. याशिवाय मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी झोप आणि योग्य व्यायामही महत्त्वाचा आहे.

या गोष्टी टाळाव्यात

उच्च चरबीयुक्त मांस – संपूर्ण फॅट डेअरी उत्पादने, गोड गोष्टी (कॅंडीज, कुकीज, मिठाई, भाजलेले पदार्थ, गोड पेये, स्वीटनर्स, प्रक्रिया केलेले अन्न,इ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT