corona update sakal
आरोग्य

Corona : कोरोनाची साथ खरंच संपली का?

कोरोनाची साथ खरंच संपली का? आपण घेतलेली लस त्यावर उपयोगी आहे का?

सम्राट कदम

कोरोनाची रूग्णसंख्या जरी कमी झाली असली, तरी रोज नव्या व्हेरियंटच्या बातम्या ऐकून आपल्या मनात पाल चुकचुकतेच. आशा वेळी कोरोनाची साथ खरंच संपली का? आपण घेतलेली लस त्यावर उपयोगी आहे का? असे प्रश्न आपल्याला नक्की भेडसावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ शास्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी पुणे भेटीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यातून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न....

प्रश्न : कोरोनाची साथ खरंच संपली आहे का? नसेल तर काय काळजी घ्यावी?

डॉ. सौम्या स्वामीनाथन ः नाही. काही देशांमध्ये अजूनही कोरोनाची साथ आहे. मात्र, एवढे नक्की की लसीकरणामुळे प्रत्यक्ष रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. कोरोनाचे आजवर ३०० पेक्षा जास्त सबव्हेरियंट मिळाले असून, अजूनही विषाणू सातत्याने बदल करत आहे. त्यामुळे आपल्याला सातत्याने निवडक नमुन्यांचे जनुकीय विश्लेषण करत ‘ट्रॅकींग’ करणे गरजेचे आहे. सरकारनेही कोरोनाचा प्रसार आणि रूग्णसंख्येचे नियमित देखरेख ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून साथीच्या शक्यता असल्याच तातडीने लक्षात येईल.

नव्या व्हेरीयंटवर कोरोनाची लस खरंच परिणामकारक आहे? तिचे दुष्परिणाम होतात का?

हो नक्कीच, सर्वांनीच लसीकरणाबरोबर बूस्टर डोसही घ्यायला हवेत. कोरोना लसींबद्दल काही लोकांनी गैरसमज पसरविले असून, ते दूर करण्यासाठी आमच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितच लोकांचे प्रश्न खरे असले तरी त्याला शास्रीय उत्तरे द्यावे लागतील. लसींची सुरक्षितता पाहूनच जागतिक आरोग्य संघटनेने तीला परवानगी दिली आहे. लाखो लोकांना कोरोनाची लस दिल्यानंतर एक-दोघांवर लसीचे दुष्परिणाम दिसले असतील. म्हणून लाखोंचे लसीकरण थांबविणे चुकीचे आहे. दुष्परिणाम झालेल्या लोकांवर वैद्यकीय देखरेख ठेवायला हवी.

कोरोनानंतरचे आजार गंभीर आहेत का?

कोरोनामुळे केवळ श्वसनसंस्थेवर परिणाम होत नाही. तर हृदयविकार, मधुमेह आदी आजारांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तो होऊच नये म्हणून, आपण प्रयत्न करायला हवे. कोरोनानंतरच्या आजारांसाठी सातत्याने देखरेख ठेवणे, माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे गरजेचे आहे.

ः एमआरएनए लस उपयोगाची आहे का?

मागील तीस वर्षांपेक्षा अधिक काळ एम-आरएनए लसीवर संशोधन करण्यात येत होते. कोरोनानिमित्त प्रथमच तीचा वापर करण्यात आला असून, ती उपयोगाची ठरत आहे. निश्चितच हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण असून, ते मुठभर लोकांच्या हाती असू नये. जगातील सर्वांना ते मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे. येत्या काळात सर्वांना परवडेल अशा दरात लस उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी लसनिर्मितीच्या सर्वच पर्यायांचा वापर व्हायला हवा.

ः कोरोना संपल्याचे केव्हा घोषित करणार?

ः आजही जगभरात सात ते आठ हजार लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे सध्यातरी साथीचा धोका कायम आहे. त्यादृष्टीने आपण आवश्यक काळजी घ्यावी. दर तीन महिन्यांनी यासंबंधीची बैठक होते. हा आकडा कमी झाल्यास सर्वंकष आढाव्यानंतर हे घोषित करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : मुंबईत दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरुच, रायगड, पालघरमध्ये शाळांना सुट्टी; रेड अलर्ट जारी, पुढील ४ दिवस धोक्याचे

पोलिस उपायुक्तांचे आदेश! ट्रॅफिक पोलिस नेमलेल्या ठिकाणीच असणे बंधनकारक; ‘HSRP’ नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर ‘आरटीओ’ करणार कारवाई; रिक्षा चालकांना ड्रेसकोडचे बंधन

चोरीचे दागिने घेणारा सराफही आरोपी! पावतीशिवाय दागिने घेतल्यास पोलिसांकडून कारवाई; ‘या’ कलमाखाली 3 वर्षांपर्यंत कारावास अन्‌ दंडाची शिक्षा, वाचा...

जिल्हा परिषदेच्या भन्नाट योजना! महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणी; सातवी ते बारावीतील मुलींना सायकली, टॅली, MS-CIT, कराटे प्रशिक्षण, गरीब मुलांना पैसेही

Best Banana French Toast: बिझी मॉर्निंगसाठी बेस्ट! 10 मिनिटांत बनवा बनाना फ्रेंच टोस्ट; लिहून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT