आरोग्य

Health : दिवसभरात शरीराला किती कॅलरीज गरजेच्या आहेत?

वजन कमी करण्यासाठी कॅलरीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

सामान्य माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि शरीराचे वजन संतुलित राखण्यासाठी सुमारे २०००-२५०० कॅलरीज आवश्यक असतात. वजन कमी करण्यासाठी कॅलरीवर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. अनेकदा वाढते वजन ही लोकांच्या प्रमुख समस्यांपैकी एक आहे. वजन कमी करण्यासाठी लोक खूप प्रयत्न करतात.

मग तासंतास जिममध्ये वेळ वाया घालवण, मन मारून थोडसच खाणं किंवा कोणकोणते काढे पिणे, पण यानेही त्यांना इच्छित फळ मिळतेच अस नाही. जास्त वजन हे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईडसारख्या अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकते.जर तुम्हीही वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर सर्वप्रथम आहारावर नियंत्रण ठेवा. जेवतांना कॅलरीज कमी असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

सामान्य माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे २०००-२५०० कॅलरीज आवश्यक असतात. तर एका महिलेला निरोगी राहण्यासाठी दररोज १८००-२१०० कॅलरीज आवश्यक असतात. कॅलरीची गरज ही व्यक्तीचे वय, उंची, वजन, क्रियाकलाप पातळी आणि पचन क्षमता यावर देखील अवलंबून असते.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहार काय असावा

जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर तुमचे वजन सहज नियंत्रित करता येते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या. मांसाहार कमी करा आणि आहारात भाज्यांचा अधिक समावेश करा.पोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या गव्हाच्या पिठातून कोंढा न काढता म्हणजे न चाळता कणिक भिजवावी.अन्नामध्ये तेलाचे सेवन कमी करा. तळलेले अन्न खाणे कमी करा. जेवणात कमी फॅट असलेले योगर्टचे सेवन करा. चिरलेली फळे दह्यात मिसळून खा, शरीराला अधिक पोषक आणि ऊर्जा मिळेल. दुधाऐवजी टोन्ड दूध वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT