weight loss
weight loss google
आरोग्य

Health : तूमचेही वजन वाढलंय का? ; हे पदार्थ खा, ज्याने कॅलरीज वाढणार नाहीत!

नमिता धुरी

पुणे : वजन वाढलंय म्हणून टेंशन घेणारे लोक डायटच्या नादी लागतात. आणि इच्छा नसताना खाण्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. पण, एखाद्या मित्राने ऑफर केल्यावर फास्ट फुडवर तुटून पडतात. अशाने वजन कमी नाही तर जास्तच वाढते. अशावेळी डायटमध्ये काय खावे ज्याने आपल्यासा प्रोटीन आणि फायबर तर मिळेल.आणि तुमच्या कॅलरीजही वाढणार नाहीत.

आपण ठरवतो डायट करायचं पण जेव्हा ते फॉलो करायची वेळ येते तेव्हा मात्र आपली तारांबळ उडते. त्यामुळेच आज असे काही पदार्थ पाहणार आहोत जे तूमची भुकही भागवतील आणि ते खाल्ल्याने तूमचे वजनही वाढणार नाही.

एनर्जी बॉल्स

हे एनर्जी बॉल्स ओट्स, ड्रायफ्रूट्स आणि नारळ यांसारख्या पौष्टिक पदार्थांनी बनवले जातात. प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असलेले हे एनर्जी बॉल्स खाल्ल्याने तुम्ही तुमचे आरोग्य मेंटेन ठेवण्यात यशस्वी होता. हे हे एनर्जी बॉल्स बनवण्यासाठी काजू, बदाम, खजूर, खिसलेले खोबरे, खोबरेल तेल आणि कोको पावडर एकत्र करा. ते बारीक करून त्या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तूम्हाला काहीतरी खावे वाटेल तेव्हा या एनर्जी बॉल्सने भुक शांत करा.

केळी विथ बटर

हे असलं काहीतरी ऐकूण वेगळच वाटले ना. त्यावर तूम्ही म्हणाल की, एकतर केळी खावी किंवा बटर हे दोन्ही एकत्र म्हणजे पोटाची भेळच होईल. पण, केळी विथ बटर खाल्ल्याने काहीही त्रास होणार नाही उलट फायदाच होईल. गोड चवीची केळी आणि बदाम, शेंगदाणे, काजू यांचे बटर म्हणजे प्रोटीन आणि फायबरचा खजिनाच म्हणावा लागेल. केळीचे छोटे पातळ काप करून घ्या आणि त्यामध्ये कोणतेही बटर घालून खा.

स्ट्रॉबेरी विथ कोकोनट क्रीम

जेवणानंतर काहीतरी गोड खावेसे वाटत असल्यास स्ट्रॉबेरी आणि कोकोनट क्रीमचे डेझर्ट तूम्ही नक्की ट्राय करू शकता. यासाठी बाजारात मिळणारी कोकोनट क्रीम आणून त्यामध्ये व्हेनिला इसेन्स घालावा. क्रीम ग्राइंड करून परफेक्ट व्हीप क्रीम तयार करावी. या क्रीममध्ये स्ट्रॉबेरीचे छोटे काप घालावेत. कोकोनट आणि स्ट्रॉबेरीमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT