how to get rid of Pigeons around your home Esakal
आरोग्य

Tips to Get Rid Of Pigeon: तुमच्या बाल्कनीतही कबुतरांनी केलीय घाण, अशी स्वच्छ करा कबुतरांची विष्ठा 

How to clean pigeon poop: कबुतरांची विष्ठा कशी स्वच्छ करावी आणि कबुतरांपासून कशी सुटका मिळवावी यासाठी आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत.

Kirti Wadkar

How To Get Rid Of Pigeon: भारतात तुम्ही कुठेही राहत असला तरी तुम्हाला कबुतरांचा सामना करावाच लागतो. खिडक्यांच्या सज्जावर, एअर कंडिशनरच्या एक्झॉस्टवर किंवा बाल्कनीमध्ये आणि पॅसेजमध्ये अनेक ठिकाणी हे कबूतर बसतात आणि त्यांच्या विष्ठेने घाण करतात. Marathi Tips how to get rid of Pigeons around your home

कबूतरं Pigeons दिसायला सुंदर वाटत असली, त्यांना दाणे द्यायला तुम्हाला आवडत असलं तरी त्यांची विष्ठा मात्र नकोशी वाटते. शिवाय या विष्ठेमुळे घरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता असते.

खास करून घर अनेक दिवस बंद असेल किंवा आपण काही दिवसांसाठी घराबाहेर गेलो असू तर त्यानंतर बाल्कनी Balcony किंवा खिडक्यांमध्ये कबुतरांनी अत्यंत घाण निर्माण केलेली पाहायला मिळते. ही घाण स्वच्छ करण देखील अत्यंत कठीण असतं. 

कबुतरांची विष्ठा कशी स्वच्छ करावी आणि कबुतरांपासून कशी सुटका मिळवावी यासाठी आम्ही तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहोत. 

कबुतरांची विष्ठा वरचेवर स्वच्छ करत राहणं गरजेच आहे. नाहीतर त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत जातं आणि इन्फेक्शनचा धोका देखील वाढण्याची शक्यता असते. खास करून पावसाळ्यामध्ये कबुतरांची विष्ठा योग्य वेळी स्वच्छ केली नाही तर विविध आजार पसरण्याची शक्यता असते.

कबुतरांची विष्ठा आणि तुटलेल्या पंखांमध्ये विविध प्रकारचे वायरस, बॅक्टेरिया आणि एंटीजन आढळतात. यामुळे श्वसनासंबंधीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसंच यामुळे फुफुसांसंबंधीच्या समस्या किंवा फुफ्फुस निकामी होण्याचा धोका बळावतो. 

कबुतरांची विष्ठा साफ करणं हे तसं वेळखाऊ काम आहे. कारण ही विष्ठा वाळल्यानंतर जास्त कडक होते. मात्र काही सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही ही विष्ठा सहसरीतीने स्वच्छ करू शकता.

हे देखिल वाचा-

अशी स्वच्छ करा कबुतरांची विष्ठा

कबुतरांची विष्ठा स्वच्छ करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काही वस्तूंची आवश्यकता भासेल. या वस्तूंमध्ये तुम्हाला व्हाईट विनेगर, एंटीसेप्टिक लिक्विड,वाशिंग  लिक्विड, स्क्रब आणि बादलीभर पाणी याची गरज लागेल.

आता एका बादलीमध्ये व्हाईट विनेगर आणि वाशिंग  लिक्विड हे दोन्ही समप्रमाणात घ्या. त्यानंतर त्यामध्ये तयार मिश्रणाच्या दुप्पट पाणी मिसळा.

त्यानंतर हे सोल्युशन बाल्कनीमध्ये पसरा आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी राहू द्या. त्यानंतर एखाद्या ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने ते चांगलं स्वच्छ करा. त्यानंतर संपूर्ण भागात अँटीसेप्टिक लिक्विड स्प्रे करा यामुळे संसर्ग टाळणं शक्य होईल.

कबूतरांपासून सुटका मिळवण्याचे अन्य उपाय

  • कबुतरांना विनेगर आणि बेकिंग सोड्याचा वास अजिबात आवडत नाही. यासाठी तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये विनेगर आणि बेकिंग सोडा भरबन ठेवू शकता. हा स्प्रे तुम्ही रोज बाल्कनीत मारल्यास या उग्र वासाने कबुतर बाल्कनी किंवा खिडकीजवळ फिरकणार देखील नाहीत. 

  • कबुतरांना दालचिनीचा वास देखील सहन होत नाही. यासाठी दालचिनी पावडर पाण्यात मिसळून एक मिश्रण तयार करावं. हे पाणी बाल्कनीत किंवा जिथे कबूतरं येतात त्या ठिकाणी शिंपडल्यास किंवा स्प्रे केल्यास कबुतरांचा बंदोबस्त होईल. 

कबुतरांना रोखण्याचा उपाय

  • कबुतरांना बाल्कनीत किंवा खिडकीमध्ये येण्यापासून रोखण्याचा उत्तम पर्याय म्हणजे या ठिकाणी एखादी जाळी बसवा. या ठिकाणी तुम्ही लोखंडी किंवा स्टीलची जाळी बसवू शकता. तसंच शेडनेटचा कापडही तुम्ही इथे लावू शकता. 

  • एसी चे एक्झॉस्ट किंवा खिडकीच्या सज्जावर तुम्ही प्लास्टिकचे काही काटे बसवू शकता यामुळे कबूतरं या जागी पुन्हा येणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT