flu  sakal
आरोग्य

Health News : स्वाइन फ्लू बाधिताने स्पर्श केलेल्या वस्तूतून संसर्गाची भीती

कोरोना आणि स्वाईन फ्लूची लक्षणं एकसारखीच आहेत; स्वाइन फ्लू अर्थात एच १ एन१ हा विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतो.

सकाळ वृत्तसेवा

‘स्वाईन फ्लू’ श्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा ‘टाइप-ए’ च्या ‘एच१एन१’ या विषाणूंमुळे हा आजार होतो. ‘स्वाईन फ्लू’ हा सामान्य ‘फ्लू’ अर्थात साध्या तापासारखा आहे. याची लक्षणेदेखील सामान्य तापासारखीच आहेत. मात्र खोकला, सर्दी किंवा स्वाईन फ्लूने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना हात लावल्यानेही संसर्ग पसरण्याची शक्यता असते. नाक, डोळे आणि तोंडावाटे हा व्हायरस शरीरात प्रवेश करतो.

कोरोना आणि स्वाईन फ्लूची लक्षणं एकसारखीच आहेत. स्वाइन फ्लू अर्थात एच १ एन१ हा विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतो. शरीरात प्रवेश केल्यानंतर १ ते ७ दिवसांच्या कालावधित रुग्ण स्वाईन फ्लू संक्रमित होतो. लक्षणे दिसू लागल्यानंतर पुढील सात दिवस रुग्ण हा आजार दुसऱ्यांमध्ये पसरवू शकतो. लहान मुले दीर्घकाळ स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरवू शकतात. इन्फ्लूएन्झा विषाणूचे विविध प्रकार आहेत. कमी-जास्त प्रमाणात हे विषाणू गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

स्वाइन फ्लूची लक्षणे

ताप (१०२-१०३ डिग्री)

थंडी वाजणे

खोकला (कफ होणे)

घशात खवखव होणे

अंगदुखी-डोकेदुखी

खूप जास्त थकवा येणं

डायरिया, उलट्या होणे

हे करू नका

हस्तांदोलन

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका

आपल्याला लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

हे करा

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.

पौष्टिक आहार घ्या.

लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करावा

धूम्रपान टाळा

पुरेशी झोप घ्या

भरपूर पाणी प्या

सॅनीटायझरने हात निर्जतुंक करावा

खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा

वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तु, जागा निंर्जतूक करा

एखाद्याला सर्दी, ताप आहे, अशा रुग्णांनी गर्दीत जाण्याचे टाळावे. शिंकेतून इतरांना स्वाइन फ्लूची लागण होऊ शकते. अशावेळी मास्क वापरलेला योग्य राहील. नागरिकांनीदेखील गर्दीत जाण्याचे टाळावे. वेळोवेळी हात धुणे, स्वच्छता पाळणे, अशी काळजी घ्यावी. घरात एखादा रुग्ण असेल तर त्यांनी स्वतःला घरातील इतर सदस्यांपासून दूर ठेवावे.

डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका छत्रपती संभाजीनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT