health  sakal
आरोग्य

Health News : स्वतःच ओळखा मुखाच्या कॅन्सरची पहिली पायरी

शासनाकडून धडक मोहीम राबवली जाते. पण, तरीही चोरट्या मार्गाने मिळणारा गुटखा अनेकजण खातात. गुटखा आणि तंबाखूच्या व्यसनामुळे कॅन्सर होतो.

सकाळ वृत्तसेवा

शारीरिक आरोग्य सदृढ राखण्यासाठी प्रयत्न होतात. परंतु, मौखिक तसेच दातांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. आपल्या मौखिक आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. सर्वांगीण आरोग्य सुदृढ ठेवण्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास याचा परिणाम वृद्धावस्थेत होतो. त्यातच महाराष्ट्रात गुटखा, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी

आहे. शासनाकडून धडक मोहीम राबवली जाते. पण, तरीही चोरट्या मार्गाने मिळणारा गुटखा अनेकजण खातात. गुटखा आणि तंबाखूच्या व्यसनामुळे कॅन्सर होतो. तो होण्याची पहिली पायरी स्वतःच मौखिक निरीक्षण केले तर लक्षात येते, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.

एखादा दात जोपर्यंत खूपच ठणकायला लागत नाही, तोपर्यंत लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मौखिक आरोग्याचा मनुष्याच्या सामान्य आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे. मौखिक शुद्धता आणि दंत आरोग्य याकडे नागरिकांचे लक्ष नाही. यामुळे वृद्धावस्थेत मौखिक पेशींवर परिणाम होतो. या दुर्लक्षितपणामुळे चघळणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थामुळे मुखपुर्व कॅन्सर होतो. याचे विद्यार्थी आणि तरुणांमध्ये प्रमाण जास्त आहे.

मुखाच्या कॅन्सरची, पहिली पायरी, पांढरे चट्टे, लाल चट्टे, तोंड न उघडण्याची व्याधी

हे करा...

दररोज सकाळी आणि रात्री किमान तीन मिनिटे दात ब्रशने स्वच्छ करा

टंग क्‍लीनर किंवा हाताने जीभ नियमितपणे स्वच्छ करा

दातांतील अन्नकण टोकदार वस्तूने न काढता ‘डेंटल फ्लास’ वापरा

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहिले पाहिजे.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कॅन्सर होतो. तंबाखू आणि इतर व्यसन करणाऱ्यांना सहा पट अधिक कॅन्सरचा धोका असतो. यामुळे तंबाखू, बीडी, सिगरेट या व्यसनापासून दूर राहावे. तोंडाची जखम झाली असेल व ती बरी होत नसेल, तोंड उघडत नसेल तर अशा वेळी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत.

डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्याधिकारी, शासकीय कॅन्सर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT