आरोग्य

Women Health : महिलांनो, मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी करा ही तीन योगासने...

मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखतं, असह्य वेदना होतात? मग ही आसनं रोज करा

सकाळ डिजिटल टीम

मासिक पाळी दरम्यान, बहुतेक महिलांना असह्य वेदना, पचन समस्या आणि इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक महिलांसाठी हा काळ खूपच त्रासदायक असतो. काहीजणींना या मासिक पाळीचा खूप त्रास होतो तर काहींना अजिबात वेदना होत नाहीत. काही महिलांना पोटात दुखणे, क्रॅम्प्स, मूड स्विंग आणि ब्लोटिंग अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

यापासून आराम मिळवण्यासाठी आरोग्य तज्ञ पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा आणि लोहयुक्त अन्न खाण्याचा सल्ला देतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की मासिक पाळीच्या वेदनापासून नैसर्गिकरित्या मुक्त होण्यासाठी अनेक व्यायाम फायदेशीर ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही अतिशय सोपे व्यायाम घेऊन आलो आहोत, ज्यांच्या नियमित सरावाने पीरियड क्रॅम्प्सपासून खूप आराम मिळतो.

1. बालासन

बालासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनाची अवस्था घेऊन योगा मॅटवर बसा. त्यानंतर पायाचे तळवे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा. गुडघे शक्य होतील तेवढे एकमेकांपासून दूर करा. आता कंबरेतून खाली वाका आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचे पोट, छाती असेल, अशा पद्धतीने शरीराची अवस्था घ्या. डोके खाली जमिनीवर टेकवा आणि हात समोरच्या बाजूने सरळ रेषेत पसरवा.

2. तितली आसन

दोन्ही पाय समोर ठेवून बसा. पाय गुडघ्यातून वाकवून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटतील असे ठेवा. हात गुडघ्यावर ठेवून गुडघे वरच्या बाजूला उचला. त्यानंतर गुडघे खाली घेऊन जा आणि जमिनीला पायांनी स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे चार-पाच वेळा करा. यानंतर हातांनी पायांचे तळवे पकडा. आता गुडघे वेगानं वर-खाली करत राहा. म्हणजे फुलपाखरांचे पंख जसे वर-खाली होत असतात तसेच. श्वासोच्छ्वासाची गती सामान्य ठेवत आठ ते दहा वेळा ही क्रिया करा.

3. आनंद बालासन

योगा मॅटवर सरळ रेषेत पाठ जमिनीला चिकटवून झोपून घ्यावे. श्वास आत घेत आपले दोन्ही पाय वर उचला. दोन्ही पाय आकाशाच्या दिशेनं सरळ स्थितीत असावे. गुडघ्यांमध्ये पाय मोडू नका. आता आपल्या दोन्ही हातांनी पायांची बोटे पकडा. आपल्या क्षमतेनुसारच हे आसन करावे. आपले कोपर आणि गुडघे छातीजवळ आणावे आणि पाय किंचितसे दूर आकाशाकडे वर न्यावेत. आपली हनुवटी छातीजवळ आणण्याचा प्रयत्न करा, पण डोके आणि कंबर जमिनीवरच राहील याची काळजी घ्यावी.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT