eggs Esakal
आरोग्य

Health Tips : तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी रोज खाता आहात? होऊ शकतं तुमच्या शरीराचे हे नुकसान

हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो.

सकाळ डिजिटल टीम

पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. मात्र. त्याच वेळी, अंडी खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल बऱ्याच काळापासून वाद आहेत. अंडी हृदयासाठी चांगली नसल्याचा दावाही अनेकदा करण्यात आला आहे. परंतु, यासंदर्भात नेमका पुरावा अद्याप मिळालेला नाही.

आजकाल जगभरातील डॉक्टर लोकांना आहारात अंड्यांचा समावेश करण्यास सांगतात. त्यासाठी, रोज एक किंवा दोन अंडी खाणे अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रथिनांनी युक्त असलेले अंडे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्यांबद्दलही असंच म्हणता येईल का? फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी तुमच्या आरोग्यासाठी बाहेर ठेवलेल्या अंड्यांइतकीच फायदेशीर आहेत का? उत्तर बहुतेक लोकांना निराश करू शकते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी का खाऊ नयेत याविषयीची सविस्तर माहिती...

Egg Storage : हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो. कारण त्यात प्रोटीन, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात, पण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने हे गुणधर्म नष्ट होतात. बर्‍याचदा लोकांना वाटते की अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने ती सुरक्षित राहते, पण तसे नाही. अंड्यातील प्रथिने, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड फ्रीजमध्ये ठेवल्याने नष्ट होतात.

अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने ताजी राहते. परंतु कमी तापमानामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे त्यांची खरी चवही संपते. साल्मोनेला बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी अंडी योग्य तापमानात साठवून ठेवावीत. साल्मोनेला बॅक्टेरिया अंडी बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही दूषित करू शकतात. अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यावरील बॅक्टेरियाही वाढू शकतात. अशा स्थितीत ते अंड्याच्या आतही शिरण्याची शक्यता असते.

फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी उकळल्यानंतर बहुतेक अंडी लगेच फुटतात. त्यामुळे फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर जर अंडे उकळायचे असेल तर आधी ते खोलीत काही वेळ उघडे ठेवा, जेणेकरून त्याचे तापमान सामान्य होईल, तरच तुम्ही ते उकळण्यासाठी ठेवा. कधी कधी अंड्याच्या वरच्या भागावर घाण राहिली तर ती फ्रीजमधील इतर गोष्टींनाही संक्रमित करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT