Health Tips  esakal
आरोग्य

Avoid Food with Bitter Gourd: कारल्यासोबत या पाच गोष्टी कधीच खाऊ नका, फायदे नाहीच उलट अंगलटच येईल!

कारल्याची भाजी खाण्याबाबतही काही पथ्य पाळावी लागतात

Pooja Karande-Kadam

Avoid Food with Bitter Gourd : तसं तर आपल्या आहारात असलेला भाजीपाला आपलं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतो. ती निसर्गाची देणगीच आहे. पण भाजी कशासोबत खावी याचेही काही नियम आहार शास्त्रात सांगितले आहेत.  त्यामधीलच आज कारल्याच्या भाजीबद्दल माहिती घेऊयात.

कारलं खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारल्याचा रोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक फायदे मिळतात. त्यामुळेच कारल्याचा वापर औषध म्हणूनही केला जातो. कारल्याची भाजी, कारल फ्राय करूनही खाल्ल जातं. कडू असलं तरी आरोग्यासाठी फायदा म्हणून आता लोक कारलं आवडीने खाऊ लागले आहेत.

पण, कारल्याची भाजी खाण्याबाबतही काही पथ्य पाळावी लागतात. ती कोणत्या पदार्थासोबत खाऊ नये, त्याचे कसे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. याबद्दल जाणून घेऊयात.  

कारलं खाण्याचे फायदे

  • शुगर असलेल्या लोकांसाठी कारलं वरदान आहे. त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहते.
    कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं.

  • कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते.

  • दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं.

  • पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याच्या रस घेणे चांगलेच असते.

  • रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृता सारखे आहेत. 

  • रक्ताळ मूळव्याध झाली असल्यास 1 चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासात आराम मिळतो.

हे पदार्थ कारल्यासोबत खाऊ नका

कारलं आणि दुध

कारल्यासारखं कडू पदार्थ खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खायची इच्छा होते. पण असं करू नका. कारल्यासोबत दुध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ नका. कारलं खाल्ल्यानंतर लगेचच दुध पिल्याने पोटाचा त्रास सुरू होतो. पोटात जळजळ होणे, गॅस होणे, अपचनासारख्या समस्या सुरू होतात.

मुळा

कारलं आणि मुळा या दोघांची चव एकदम भिन्न असते. त्यामुळे हे पदार्थ एकमेकांसोबत खाऊ नका. कारलं खाल्ल्यानंतर चुकूनही मुळ्याची भाजी, सॅलड खाऊ नका. त्यामुळे ऍसिडीटी आणि अपचन होऊ शकते.

कारलं दही 

कारलं आणि दही एकत्र खाणे धोकादायक असते. त्यामुळे स्कीन संबंधी तक्रारी उद्भवू शकतात. त्वचा कोरडी होणे, रूक्ष होणे अशा पद्धतीचे आजार होऊ शकतात. त्यामुळे कारलं दह्याचं कॉम्बिनेशन दूरच ठेवा.

कारलं आणि भेंडी

आजकाल काहीह खाल्ल की पचन होत नाही, काही खाल्लेलं पचत नाही, अशी रड प्रत्येकाची असते. असा त्रास तुम्हालाही असेल तर भेंडी खाल्ल्यानंतर कारलं खाऊ नये. आणि कारलं खाऊन भेंडी खाऊ नये. भेंडी पचायला जड असते. त्यामुळं या दोन्ही गोष्टी खाल्ल्या की अपचन होऊ शकतं.  

कारलं आणि आंबा

आंब्याचे सेवन कारल्याच्या भाजीसोबत किंवा नंतर उन्हाळ्यात केल्यास ते फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरते. कारले पचायला वेळ लागतो, तर आंबाही उशिरा पचतो. अशा परिस्थितीत कारले आणि आंबा एकत्र खाल्ल्यास उलट्या, जळजळ, मळमळ आणि ऍसिडिटी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांच्या चौकशीतून काय निष्पन्न झालं? त्यांना सोडून का दिलं?

AB de Villiers: धोनी डिव्हिलियर्सच्या सर्वोत्तम IPL संघाचा कर्णधार; प्लेइंग इलेव्हनमध्ये दिलं 'या' ७ भारतीयांना स्थान

Medicine Rate: आवश्यक औषधे स्वस्त झाली! सरकारकडून हृदयरोग, मधुमेहासह ३५ औषधांच्या किमतीत घट, जाणून घ्या नवे दर

Satara News: 'सातारा जिल्ह्यात झाडांचे होणार जिओ टॅगिंग'; प्रशासनाकडून सर्व विभागांना ५० लाखांचे उद्दिष्ट, प्रत्येक रोपाची नोंदणी

Mumbai Dengue Cases : सावधान ! मुंबईत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणियाचा धोका दुप्पट वाढला; ४,५०० हून अधिक रुग्णांची नोंद

SCROLL FOR NEXT