Health Tips News Sakal
आरोग्य

Health Tips चहासोबत या 5 गोष्टींचे सेवन चुकूनही करू नका, अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

तुम्ही देखील चहासोबत या पाच खाद्यपदार्थांचे सेवन करताय? मग वेळीच व्हा सावध

सकाळ डिजिटल टीम

Health Tips : चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. आपल्यापैकी बहुतांश जणांच्या दिवसाची सुरुवात चहा पिऊनच होते, त्याशिवाय कोणत्याही कामामध्ये मन लागणं कठीणच. तर काहींना चहासोबत नाश्ता करण्याची किंवा बिस्किट, शेव इत्यादी खाद्यपदार्थ खाण्याचीही सवय असते.

पण काही खाद्यपदार्थ असे असतात, ज्यांचे सेवन चहासोबत करणं आरोग्यासाठी योग्य नसते. कारण यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. यासह अन्य शारीरिक समस्याही उद्भवू शकतात. म्हणूनच चहासोबत कोणते खाद्यपदार्थांचे सेवन करावे तसंच करू नये, याबाबत तुम्ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.  

चहासोबत या पाच पदार्थांचे सेवन करणं टाळा 

बिस्किट आणि रिफाइंड साखर : चहासोबत साखर-मैदायुक्त बिस्किटाचे सेवन केल्यास शरीरामध्ये अधिक प्रमाणात इन्सुलिन तयार होते.  

लोणचे

चहामध्ये टॅनिनचे घटक असतात आणि लोणच्यामध्ये तेल-मिठाचे प्रमाण असते. त्यामुळे लोणचे व चहाचे एकत्रित सेवन केल्यास शरीराच्या पचनप्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. 

चहा आणि दही

चहामध्ये टॅनिनचे घटक आणि दह्यातील प्रोटीनचे घटक एकत्रित पोटात गेल्यास शरीराची पचनप्रक्रिया मंदावते. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

फळे

लिंबूवर्गीय फळे जसे की संत्रे, मोसंबी यासारख्या फळांचे चहासोबत सेवन केल्यास पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ पोट दुखणे, पोट फुगणे इत्यादी. तसेच चहा पिण्यापूर्वी किंवा चहा प्यायल्यानंतर आंबट-तुरट फळे खाल्ल्यासही आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

साखर आणि गरम मसाले

गरमागरम चहासोबत अधिक प्रमाणात गोड आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यासही पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

हेली दारूवालाचा ‘लव्ह लॉटरी’मध्ये नवा अवतार; कोर्टरूम थ्रिलरमध्ये साकारली गुंतागुंतीची भूमिका

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेक विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

SCROLL FOR NEXT