Health Tips Vitamin B12 
आरोग्य

Health Tips : व्हिटामिन बी १२ चे फायदे?

दररोज पुरुषांसाठी २.४ मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी १२ आणि महिलांसाठी२.६ मायक्रोग्राम सेवन करणे आवश्यक आहे

सकाळ वृत्तसेवा

व्हिटॅमिन बी १२ शरिरासाठी आवश्‍यक असणारे पोषकत्त्व आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे जेव्हा आपण आहाराकडे लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे या तत्वाची कमतरता निर्माण होते. दररोज पुरुषांसाठी २.४ मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी १२ आणि महिलांसाठी२.६ मायक्रोग्राम सेवन करणे आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे, अन्यथा शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होते.

कमतरतेची लक्षणे

  • खुप थकल्यासारखे वाटणे

  • जर तुम्हाला व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने थकवा जाणवेल.

  • शरीरातील पेशींना योग्यरित्या कार्य करण्यासाठी बी१२ ची आवश्यकता असते.

  • याच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होऊ शकते.ज्यामुळे ऑक्सिजन वितरण बिघडू शकते व शरीर थकते.

त्वचेला पिवळेपणा येणे

  • व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे आपली त्वचा पिवळी पडू लागते.

  • कारण अशाप्रकारे अॅनिमियाची लक्षणे दिसू लागतात.

  • रक्ताच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग तर बदलतो.

  • डोळ्यांचा पांढरा रंगही पिवळा होतो.

  • पिवळा रंग प्रत्यक्षात उच्च बिलीरुबिन पातळीमुळे होतो.

डोकेदुखी होणे

जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी होऊ लागते, तेव्हा ते न्यूरोलॉजिकल साइड इफेक्ट्स वाढवते ज्यामध्ये डोकेदुखीचा समावेश होतो. हे सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक आहे, म्हणून चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका.

पोटात गडबड

  • व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे, पोटात समस्या सुरू होतात.

  • ज्यामुळे अतिसार, उलट्या, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि गॅसच्या तक्रारी असू शकतात.

  • अशा परिस्थितीत ताबडतोब तपासणी करावी.

  • योग्य आहार घेणे सुरु करा.

मानसिक समस्या

  • व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो.

  • त्यामुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.

  • नैराश्य, तणाव आणि चिडचिडेपणाचा सामना करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT