Health Tips news esakal
आरोग्य

Health Tips : गवतावर अनवाणी चालल्याने होतात फायदे, दररोज चाला इतके तास

निरोगी जीवनासाठी निसर्गाची साथ खूप महत्त्वाची

सकाळ डिजिटल टीम

Health Tips : निसर्ग आपल्याला हवं ते सगळ देत असतो. निसर्गात आपल्याला सगळ्या प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. निरोगी जीवनासाठी निसर्गाची साथ खूप महत्त्वाची आहे. जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंट अँड पब्लिक हेल्थ मधील एका अभ्यासानुसार असं समोर आलं आहे की, आज लोक वाईट काळात जगत आहेत कारण त्यांचा पर्यावरणाशी सहसा संबंध येत नाही.

अभ्यासात असंही समोर आले आहे की जर एखाद्या व्यक्तीला पृथ्वीच्या विद्युत उर्जेची जोड मिळाली तर त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारचे मानसिक बदल होतात. अशाच एका संशोधनातून हेही समोर आले आहे की गवतावर चालण्याने माणसाच्या आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात ,चला तर मग जाणून घेऊयात गवतावर चालण्याचे कोणते फायदे आहेत.

गवतावर अनवाणी चालण्याचे फायदे

मनाला शांती मिळते

हिरव्या गवतावर पहाटे अनवाणी चालल्याने मानसिक शांती मिळते. अनेक रिपोर्ट्समधून ही बाब समोर आली आहे.

झोपेचा त्रास होणार नाही

आजच्या काळात प्रत्येक माणूस कमी झोपेचा सामना करत आहे. अशा वेळी तुम्हालाही शांत झोप घ्यायची असेल, तर आजपासूनच हिरव्यागार गवतावर अनवाणी चालायला सुरुवात करा. दररोज किमान अर्धा तास गवतावर चाला.

हृदय निरोगी राहते

रोज गवतावर अनवाणी चालल्याने हृदयाला खूप फायदा होतो. गवतावर चालल्याने हृदयाचे ठोके आणि रक्तदाब संतुलित राहतो.

डोळ्यांसाठी देखील चांगले

गवतावर अनवाणी चालण्यानेही डोळे निरोगी राहतात. असं म्हणतात की गवतावर चालल्याने दृष्टी सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय; पत्रकार परिषद घेत म्हणाले...

Holi Holiday: मोठी बातमी! होळीपूर्वी पगार होणार; ३ दिवस सुट्टी मिळणार, कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

T20 World Cup : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामना पाकिस्तानसाठी का आहे महत्त्वाचा? आजच शेजाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार...

Mumbai Local: लोकल प्रवास अधिक सुरक्षित होणार, प्रवासी सुविधा वाढणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT