Health Tips
Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : फ्रिजमध्ये ठेवलेल्या या गोष्टी चुकूनही खाऊ नका, नाहीतर थेट रूग्णालयात..

साक्षी राऊत

Health Tips : अलीकडे अनेक आरामदायी वस्तूंनी आपले जीवन सुखकर केले आहे. आजच्या काळात फ्रीज हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कारण धावपळीच्या जीवनात लोक फ्रीजमध्ये वस्तू ठेवतता जेणेकरून त्या खराब होऊ नये.

त्यामुळे वस्तू जास्त काळ खराब होत नाहीत. पण जर तुम्हीही काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून खात असाल तर तुम्ही तुमच्या जीवाशी खेळत आहात. कारण काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. तेव्हा फ्रिजमध्ये ठेवून कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? ते आज आपण जाणून घेऊयात.

हे अन्नपदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नका-

टोमॅटो खाऊ नका-

टोमॅटोचा वापर ग्रेव्ही बनवण्यासाठी केला जातो. तर प्रत्येक भाजीतसुद्धा टोमॅटोचा वापर होतोच. बहुतेक लोक टोमॅटो दीर्घकाळासाठी फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की असे करून तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात.

कारण टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने ते लवकर खराब होते, परंतु लोकांना हे माहित नसते आणि ते ते वापरतात. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे फ्रीजमध्ये टोमॅटो जास्त काळ ठेवणे टाळा.

केळी खाण्याची चूक करू नका

बहुतेक लोक फळे आणतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. पण असे केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. होय, जर तुम्ही केळी फ्रीजमध्ये ठेवून खात असाल तर ते तुमचे आरोग्य बिघडवू शकते.

तसेच केळी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काही वेळाने ती काळी पडतात. जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. तेव्हा फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने तुमच्या आरोग्याला धोका होतो. शिमला मिर्चीसुद्धा फ्रिजमध्ये ठेवून खावू नये. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक तत्वे कमी होतात. आणि त्याचा टवटवीतपणासुद्धा जातो. तेव्हा या गोष्टी फ्रेश आणा आणि फ्रेशच बनवण्यास प्राधान्य द्या. (Health News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT