आरोग्य

Health Tips : आयुर्वेदीक काढा पिणे आरोग्यासाठी धोकादायक? या आजारांना मिळते आमंत्रण

भारतामध्ये लोक औषधांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने काढा बनवून पितात

सकाळ वृत्तसेवा

दसरा दिवाळी झाली की लोक आजारी पडतात. सर्वांनाच सर्दी खोकला व्हायरलची साथ येते. वातावरणात होणारा बदल याला कारणीभूत असतो. त्यामुळे खवखवणे, सूज येणे, खोकला, सर्दी होते. या आजारापासून आराम मिळावा यासाठी अनेक घरगूती उपायही केले जातात. पण, या उपायांमुळे नुकसान देखील होऊ शकते. ते फायद्याऐवजी आपले नुकसान कसे करते ते जाणून घ्या.

कोणत्याही आजारावर मात करण्यासाठी तुमच्या शरिरातील मोठ्या प्रमाणात रोग प्रतिकारकशक्ती हवी. कोणाला गोळ्या औषधांपेक्षा प्राकृतिक, घरगुती गोष्टींपासून फायदा मिळातो. सर्दी-खोकल्यासारख्या आजारांवर मात करण्यासाठी विविध प्रकारच्या काढा प्यावा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे घरातील आजी, आई तूम्हाला काढे बनवून देतात. पण या काढ्याचा वापर अती झाल्याने भलत्याच समस्यांना तोंड द्यावे लागते.

भारतामध्ये लोक औषधांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आयुर्वेदिक पद्धतीने काढा बनवून पितात. परंतु त्याच्याशी संबंधित एक चूक हानिकारक असल्याचे सिद्ध होते. जाणून घेऊयात काढा पिण्याचे तोटे कोणते आहेत.

किडनी

कोरोनाच्या काळात ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशांना कोरोना होण्याची जास्त भीती असते. असा निष्कर्ष डॉक्टरांनी शोधून काढला होता त्यामुळे लॉकडाऊन काळात काढा करून पिण्याचे प्रमाण अधिक होते. पण. त्या काळात अधिक काढा पिल्याचे परिणाम आता लोकांमध्ये दिसू लागले. लोकांच्या किडणीवर त्याचा वाईट परीणास झाला. त्याचा वाईट परिणाम किडनीवर दिसू लागला. त्यामुळे दिवसातून एकचवेळा काढा प्या.

लीव्हर

शरीराचा महत्त्वाचा भाग असलेल्या लीव्हरसाठी काढ्याचे जास्त सेवन करणे चांगले नाही. असे तज्ज्ञांचे मत आहे. जास्त काढा प्यायल्याने यकृत विषारी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हीही नियमित पेय म्हणून काढ्याचे सेवन करत असाल तर आजपासून ही सवय बंद करा.

मूळव्याध

घरगुती काढ्यामध्ये लवंग, दालचिनी, काळी मिरी यांचा वापर करतात. हे मसाले उष्ण असल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या मसाल्यांमुळे पाइल्सचा त्रास सुरू होतो. त्यामुळे असे काढे बनवताना काळजी घ्या.

अॅसिडिटी

काढ्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. काढ्यात दिसेल ते मसाले वापरले जातात. त्यामुळे तूम्हाला ऍसिडिटी होऊ शकते. खोकला आणि सर्दी झाल्यावर २ दिवसच याचे सेवन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT