How To Keep Colon Healthy  Sakal
आरोग्य

Colon Health : कोलनमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडत नाहीय? जाणून घ्या सोपे उपाय व फायदे

शरीर बाहेरून सुंदर असणं जितके महत्त्वाचे असते, तितकेचे आतील बाजूनंही स्वच्छ असणं आवश्यक असते. याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

Harshada Shirsekar

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश जण आरोग्य निरोगी कसे राहील यापेक्षा बाहेरील सौंदर्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. परिणामी आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवतात. धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे कित्येक जण रेडी टू इट, जंक फूड, फास्ट फूड यासारख्या पर्यायांवर अवलंबून आहेत. 

पण यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणामच होत आहेत, हे लक्षात घ्या. तेलकट, तिखट, प्रोसेस्ड फूड, पाकिटबंद पदार्थांमध्ये शरीरास अपायकारक असणाऱ्या घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे कोलनमध्ये म्हणजे मोठ्या आतड्यांमध्ये  (Colon Health) विषारी घटक व घाण जमा होऊ लागते. 

कोलनमध्ये जमा झालेली घाण वेळीच शरीराबाहेर फेकली गेली नाही, तर याचे परिणाम आरोग्यावर पाहायला मिळतात. आपल्या शरीराच्या आतील बाजूस असणारे कोलन स्वच्छ राहावे, यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा, पौष्टिक आहार आणि व्यायामचे रूटीन काटेकोर पद्धतीने पाळणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

हिरव्या भाज्या

कोलन स्वच्छ करण्यासाठी आपण आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. कारण या भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे आणि अन्य पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात साठा असतो. महत्त्वाचे म्हणजे हिरव्या भाज्यांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे मोठ्या आतड्यांची स्वच्छता होण्यास बरीच मदत मिळते. शिवाय यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. 

भाज्यांचा रस 

भाज्यांचा रस योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात प्यायल्यास मोठे आतडे स्वच्छ होण्यास व त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. कारण यामध्ये फायबर, व्हिटॅमिन, खनिजे आणि अन्य पोषकघटकांचा समावेश असतो. व्हिटॅमिन सी युक्त खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास मोठे आतडे स्वच्छ राहण्यास मदत मिळू शकते.  

योगासने

मोठ्या आतड्यांच्या स्वच्छतेसाठी नियमित व्यायाम करणंही आवश्यक आहे. शिवाय शारीरिक व मानसिक आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळेल. मोठे आतडे स्वच्छ करण्यासाठी पश्चिमोत्तानासन, धनुरासन, भुजंगासन इत्यादी आसनांचा नियमित सराव करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT