Khajur Benefits In Marathi Sakal
आरोग्य

Benefits of Eating Dates : मेंदू व आरोग्यासाठी फायदेशीर आहे खजूर, जाणून घ्या अगणित फायद्यांची माहिती

Khajur Benefits In Marathi : खजूरमध्ये फायबर, पोटॅशिअम आणि अँटी- ऑक्सिडंट यासारख्या पोषणतत्त्वांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तसंच साखरेऐवजी आपण डाएटमध्ये खजुराचा समावेश करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Healthcare Tips : शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जेचा पुरवठा व्हावा, यासाठी आहारतज्ज्ञ डाएटमध्ये खजुराचा समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण यामध्ये पोटॅशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो. 

जर आपण आहारातून साखर वर्ज्य करण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी खजुराचे सेवन करू शकता. यामुळे शरीराला कोणतेही अपाय होणार नाहीत शिवाय ऊर्जेचा पुरवठा देखील होईल. 

तसंच खजुरामध्ये लोह, मॅग्नेशिअम यासारख्या व्हिटॅमिन व खनिजांचाही साठा मुबलक प्रमाणात आहे. महत्त्वाचे म्हणजे खजूर हे ग्लुटेन फ्री, चवीला स्वादिष्ट व पौष्टिक खाद्य आहे. आपण खजुराचा समावेश नाश्ता व स्मूदीमध्येही करू शकता. 

खजूर खाण्याचे पाच प्रमुख फायदे

पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायक

खजुराच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळते. कारण यामध्ये फायबरची मात्रा अधिक असते. खजुरातील पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

मानसिक आरोग्य

यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे मेंदूमधील सूज व ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त खजुरामध्ये पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषकघटक देखील आहेत, जे मेंदूच्या कार्यप्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. 

हृदयाचे आरोग्य  

खजुरामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण खूप असते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. यातील खनिजांमुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडते आणि हृदयविकारांचा धोका देखील कमी होण्यास मदत होते. कारण यामध्ये कोलेस्ट्रॉल व सोडियमचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. 

हाडांचे आरोग्य राहते निरोगी

खजूरमध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस यासारखे खनिजे असतात, हे घटक शरीराची हाडे मजबूत ठेवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.  

शरीराचे वजन राहते नियंत्रणात  

खजूरमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते व फायबरचे प्रमाण जास्त असते, हे घटक शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामुळे शरीराला वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होत नाही. तसंच आहारातून साखर वर्ज्य करायची असेल तर यास खजूर हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT