शांत झोप नाही लागत? Esakal
आरोग्य

Sleeping Habits : रात्री सतत जाग येणं असू शकतं ‘या’ गंभीर आजाराचं लक्षण, आजच घ्या काळजी

अनेकांना रात्री लगेचच झोप Sleep लागत नाही. तर काहींना झोप लागली तरी रात्री सतत जाग येते आणि पुन्हा झोपही येत नाही. खास करून रात्री १ ते ४ या काळामध्ये जर सतत जाग येत असेल तर हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं

Kirti Wadkar

निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायामासोबतच पुरेशी आणि शांत झोप Sleep अत्यंत गरजेची आहे. दररोज किमान ६-७ तासांची शांत झोप न झाल्यास शारिरीक समस्यांसोबतच विविध मानसिक समस्या देखील निर्माण होवू शकतात. Health Tips in Marathi Fatty Liver may cause sleeplessness

अनेकांना रात्री सतत जाग येते. जर रात्री सतत झोपमोड होत असले तर हे काही गंभीर आजारांचे संकेत असू शकतात. खास करून लिव्हर म्हणजेच यकृताशी संबंधीत आजारांमध्ये रात्री सतत जाग येण्याची समस्या निर्माण होते.

अनेकांना रात्री लगेचच झोप Sleep लागत नाही. तर काहींना झोप लागली तरी रात्री सतत जाग येते आणि पुन्हा झोपही येत नाही. खास करून रात्री १ ते ४ या काळामध्ये जर सतत जाग येत असेल तर हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

फॅटी लिव्हरच्या Fatty Liver समस्येत म्हणजेच यकृतावर मोठ्या प्रमाणात फॅट्स जमा झाल्यास ही समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येत यकृताच्या कार्यावर परिणाम होत असल्याने योग्य काळजी घेणं गजेचं असतं.

झोपेचा आणि लिव्हरचा संबध

रात्रीच्या झोपेचा आणि लिव्हरचा संबंध काय असा प्रश्न कदाचित अनेकांना पडेल. तर रात्री १ ते ४च्या दरम्यान लिव्हर शरीर डिटॉक्स म्हणजे स्वच्छ करण्याचं काम करत असतं. त्यामुळेच जर या वेळेमध्ये तुम्हाला सतत जाग येत असेल तर याचा अर्थ यकृताशी संबधीत काही समस्या निर्माण झाल्या आहेत.

लिव्हरवर फॅट्स जमा झाल्यास किंवा लिव्हरचं कार्य मंदगतीने होवू लागल्यास शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिव्हरला जास्त ताकद लावावी लागते. असं झाल्यास नर्व्हस सिस्टम ट्रिगर होते आणि आपल्याला जाग येते. मात्र जर तुमची लिव्हर निरोगी म्हणजेच हेल्दी असेल तर हे कार्य सुरळीतपणे सुरु असल्याने तुम्ही शांत झोपू शकता.

हे देखिल वाचा-

यामुळे लिव्हरवर साचतात फॅट्स

लठ्ठपणा हे फॅटी लिव्हरचं एक मुख्य कारण आहे. यासाठीच वजन नियंत्रणात ठेवणं आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

तसंच अती प्रमाणात तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने देखील यकृतावर फॅट्स जमा होतात.

काही वेळेस टाइप- २ डायबेटिस असलेल्या रुग्णांमध्ये देखील फॅटी लिव्हरची समस्या आढळून येते.

थायरॉइडच्या रुग्णाना फॅटी लिव्हरचा त्रास होवू शकतो.

काही पदार्थांच्या सेवनामुळे फॅटी लिव्हरच्या समस्येवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.

लसूण- लसणामध्ये असलेल्या अँटीइंफ्लेमेटरी गुणांमुळे यकृत निरोगी राहण्यास मदत होते. यासाठीच ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. त्यांनी आहारामध्ये लसणाचा समावेश आवर्जुन करावा.

चणे, राजमा- बीन्स, चणे किंवा राजमा सारखे पदार्थांच्या सेवनामुळे फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते. या पदार्थांमध्ये उपलब्ध असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

सुर्यफुलाच्या बिया- सुर्यफुलाच्या बियांमध्ये आढळणारं व्हिटॅमिन ई हे अँटीऑक्सिडंट प्रमाणे कार्य करतं. यामुळे लिव्हर निरोगी राहण्यास मदत होते.

एकंदरच जर यकृत निरोगी असले तर तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

INDW vs PAKW: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरही हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, आता मायदेशात गेल्यानंतर...

RSS History: अभ्यासक्रमात आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास'; 'या' विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

SCROLL FOR NEXT