Health Tips esakal
आरोग्य

Health Tips : तुमचे रोज पाय दुखतात का? ट्राय करा या टिप्स

रोज पाय दुखण्याची समस्या लहान मुलं आणि वयस्क माणसांमध्ये अधिक दिसते.

सकाळ डिजिटल टीम

Foot Pain Remedies : हल्ली सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे. खूप वेळ उभे राहणे किंवा खूप चालणे, पळण्यामुळे पाय दुखतात. पण रोज पाय दुखण्याची समस्या लहान मुलं आणि वयस्क माणसांमध्ये अधिक दिसते.

व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेने तसंच बराचवेळ अनकंफरटेबल चप्पल घालणे, दिवसभर धावपळ यामुळे रोज पाय दुखू शकतात. त्यांमुळे रोज औषध खाण्या ऐवजी हे घरगुती उपाय करून बघावे.

हे उपाय करा

खोबरेल तेल

रोज रात्री झोपताना पायाला खोबरेल तेलाने मालिश करा. हलक्या हाताने मालिश करून पायात मोजे घालावे.

आले

एक ग्लास पाण्यात आले खिसून उकळून घ्या. त्यात मध घालून नीट मिक्स करून ते प्या.

पाय शेकावे

बर्फाच्या पिशवीने किंवा गरम पाण्याच्या पिशवीने पाय शेकणे फार फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे ब्लड सर्क्यूलेशन चांगले होते. पहिले गरम पाण्याच्या पिशवीने कमीत कमी १० मीनिट शेकावं. नंतर दुखऱ्या जागी आईस बॅगने शेकावे.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट पायाचे दुखणे आणि सूजेवर फायदेशीर सिध्द होते. पहिले मोठ्या कंटेनरमध्ये गरम पाणी घ्या. त्यात अर्धा कप बेकिंग सोडा मिक्स करा. त्यात २० मीनिट पाय बुडवू ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT