Underweight Side Effects sakal
आरोग्य

केवळ लठ्ठपणाच नव्हे तर वजन कमी असणंही आहे खूप धोकादायक, या आजारांना पडू शकता बळी

लठ्ठपणा तसंच शरीराचे वजन अतिशय कमी असणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी घातक असतात. वजन कमी असल्यास आपण अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Underweight Health Problems लठ्ठपणा ही आपल्या आरोग्यासाठी एक गंभीर समस्या आहे. जंक फूड, फास्ट फूड आणि वाईट जीवनशैलीमुळे तुमच्या शरीराचे वजन जलदगतीने वाढू शकते.  यामुळे कित्येक गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. 

लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह, फॅटी लिव्हर यासारख्या आजारांचा धोका वाढतो. या विकारांमुळे शरीरास होणारा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचारांची मदत घ्यावी लागते. दुसरीकडे लठ्ठपणाप्रमाणेच शरीराचे वजन अतिशय कमी (Underweight Side Effects) असणे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

शरीराचे वजन कमी असल्यास कोणकोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया… 

शरीराचे BMI (Body Mass Index) किती असावे?  

साधारणतः शरीराची उंची व वजनानुसार बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजला जातो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (Center for Disease Control and Prevention) माहितीनुसार, एखाद्या निरोगी व्यक्तीचे बीएमआय 18.5 ते 24.9 दरम्यान असावे. यापेक्षा कमी असल्यास ही मंडळी कमी वजनाच्या श्रेणीत येतात. यामुळे आरोग्यास कित्येक नुकसान पोहोचू शकते.

शरीराचे वजन कमी असल्यास होणाऱ्या पाच गंभीर समस्या

1. कुपोषणाची समस्या   

जर एखाद्या व्यक्तीचे वजन खूपच कमी असेल तर त्यांच्या शरीरामध्ये पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होते आणि हे लोक कुपोषणासारख्या आजारास बळी पडतात. यामुळे अशक्तपणा, थकवा, टक्कल पडणे, त्वचा कोरडी होणे आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात.

2. रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत

कित्येक अभ्यासांमध्ये ही बाब आढळून आली आहे की, शरीराचे वजन कमी असल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे वारंवार आजारांची लागण होते.  कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.

3. शरीराचे हाडे होतात कमकुवत  

शरीरामध्ये पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होते, त्यावेळेस व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम या घटकांचीही कमतरता होऊ शकते. अशा स्थितीत ऑस्टिओपोरोसिस आजाराची समस्याही उद्भवू शकते. या आजारात शरीराचे हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे दुखापत किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. 

4. वंध्यत्वाची समस्या  

शरीराचे वजन आवश्यकतेपेक्षा कमी असल्यास त्या व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात. यामुळे वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते.

5. शरीराची उंची वाढत नाही  

पोषणतत्त्वांच्या अभाव व कमी वजनामुळे मुलांच्या शरीराची उंची वाढत नाही. ही समस्या टाळण्यासाठी व शरीराचे वजन वाढावे यासाठी फळे, भाज्या, दूध, अंडी अशा पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT