benefits of golden milk sakal
आरोग्य

हळदीच्या दुधामध्ये चिमूटभर मिक्स करा ही पावडर, एकही आजार तुम्हाला करणार नाही स्पर्श

आपण रात्रीच्या वेळेस हळदीचे दूध पिऊन झोपत असाल तर या पेयामध्ये चिमूटभर काळ्या मिरीची पावडर देखील मिक्स करावी. कारण...

Harshada Shirsekar

Golden Milk With Black Paper : हळद आणि दूध अतिशय आरोग्यवर्धक पेय आहे. दुधामध्ये शरीरास पोषक असणाऱ्या पौष्टिक तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो, हे आपणास माहितीच असेल. तर हळदीमध्ये असणारे कित्येक प्रकारचे अँटी-ऑक्सिडंट्स आणि कर्क्युमिन कमाऊंडमुळे यास औषधी गुणधर्म प्राप्त होतात.

पण जर या पेयामध्ये चिमूटभर काळ्या मिरीची पावडर मिक्स केल्यास शरीरास अगणित फायदे मिळू शकतात. जर आपण रात्रीच्या वेळेस हळदीचे दूध पिऊन झोपत असाल तर या पेयामध्ये चिमूटभर काळ्या मिरीची पावडर देखील मिक्स करावी. असे केल्यास आपल्या आरोग्यास अगणित लाभ मिळू शकतात.  हे पेय प्यायल्याने आरोग्यास कोणकोणते लाभ मिळतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

हळदीच्या दुधामध्ये काळी मिरी का मिक्स करावी?

NDTVने दिलेल्या वृत्तानुसार, हळदीच्या दुधामध्ये काळ्या मिरीची पावडर मिक्स करण्यामागे अनेक कारणे आहेत. हळदीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण कर्क्युमिन कंपाऊंड असते, पण हे कंपाऊंड योग्यरित्या शोषून घेण्यास शरीर असमर्थ ठरते.

दुसरीकडे काळ्या मिरीमध्ये पीपेराइन कंपाऊंड असते, जे कर्क्युमिन कंपाऊंड शोषून घेण्यास मदत करते. एकूणच हळदीच्या दुधात काळ्या मिरीची पावडर मिक्स करून प्यायल्यास आरोग्यास दुप्पट फायदे मिळतात.  

हळदीचे दूध काळ्या मिरीची पावडर मिक्स करून पिण्याचे 

हळदीच्या दुधामध्ये काळ्या मिरीची पावडर मिक्स करून प्यायल्यास सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्येतून सुटका होण्यास मदत मिळते. यासह कित्येक आजारांचा धोका देखील कमी करते. हळदीच्या दुधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत मिळते.  

  • ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी झाल्यास शरीरातील इंफेक्शनशी संबंधित कोणत्याही आजाराचा धोका कमी होतो.  

  • सांधे दुखीची समस्याही कमी होते. 

  • खराब कोलेस्ट्रॉल पातळी देखील कमी होते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT