human metapneumovirus sakal
आरोग्य

HMPV Virus : तुम्हाला सर्दी झालीय? या गंभीर व्हायरसचा असू शकतो परिणाम, जाणून घ्या किती धोकादायक आहे विषाणू

हा धोकादायक व्हायरस श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. गंभीर बाब म्हणजे या व्हायरस लक्षणे कोव्हिड -१९ विषाणूप्रमाणेच आहेत.

Harshada Shirsekar

HMPV Virus : जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे झालेले दुष्परिणाम सर्वांनीच अनुभवले आहेत. पण आता कोरोना व्हायरसचा धोका राहिलेला नाहीय, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे. पण दुसरीकडे आरोग्य तज्ज्ञांनी आणखी एका व्हायरसमुळे चिंता व्यक्त केली आहे. या विषाणूचे नाव ह्युमान मेटान्युमोव्हायरस (HMPV Virus) असे आहे. 

लहान मुले,  वृद्ध तसंच दीर्घकाळापासून आजारी असणाऱ्यांना या व्हायरसपासून धोका असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असे असले तरीही सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या वर्षीच्या सुरुवातीस अमेरिकेमध्ये ह्युमन मेटोन्युमोव्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळाले होते.

ह्युमन मेटान्युमोव्हायरस म्हणजे नेमके काय?

हा विषाणू मनुष्यप्राण्याच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. हा विषाणू रेस्पिरेटरी सिन्सेशिअल व्हायरसच्या (Respiratory syncytial) गटातील आहे. या विषाणूची लक्षणे कोव्हिड १९ व्हायरसप्रमाणेच असतात. हा विषाणू २००१मध्ये नेदरलँडमध्ये सर्वप्रथम आढळला होता. 

ह्युमन मेटान्युमोव्हायरसची लक्षणे

  • सर्दी

  • ताप

  • खोकला

  • कफ

  • श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या

  • अस्वस्थ वाटणे

कोणाकोणाला आहे या विषाणूचा धोका?

  • लहान मुले

  • ज्येष्ठ नागरिक

  • रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांना धोका 

खोकणे, शिंकणे आणि संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्यास या विषाणूची लागण होऊ शकते.

कसा करावा स्वतःचा बचाव?

तज्ज्ञांच्या माहितीनुसार सध्या या आजारावर कोणतेही औषधोपचार उपलब्ध नाहीत. पण या विषाणूपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. सॅनिटाइझरचा वापर करावा, खोकताना-शिंकताना रूमालाचा वापर करावा, संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येऊ नये तसेच तज्ज्ञमंडळीच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावेत. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT