Egg Side Effects Sakal
आरोग्य

अंड्यासह कधीही खाऊ नका हे खाद्यपदार्थ, आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

जर आपण अंड्यांचे सेवन करत असाल तर त्यासोबत या खाद्यपदार्थांचे सेवन करणं कटाक्षाने टाळा.

Harshada Shirsekar

Health Tips फिटनेसप्रेमी लोक वर्कआऊटनुसार आपल्या डाएटचीही पुरेपूर काळजी घेतात. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी काही जण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार डाएट प्लान फॉलो करतात. तर काही स्वतःच्या मनाप्रमाणेच आहाराचे सेवन करतात. 

पण यामुळे फायदे कमी आणि तोटेच जास्त होण्याची शक्यता असते. चुकीचे डाएट फॉलो केल्यानं शरीरात पोषणतत्त्वांचीही कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. काही जण अंड्यासह चुकीच्या आहाराचे सेवन करतात. परिणामी यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.    

अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, पण चुकीच्या पदार्थांसोबत त्याचे सेवन केल्यास ते हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

अंडे आणि गोड पदार्थ 

अंड्यासह आपण एखाद्या गोड पदार्थाचे सेवन केले तर आरोग्यास हानिकारक ठरू शकते. कारण या दोन्ही खाद्यपदार्थांचे एकत्रित सेवन केल्यास शरीरात तयार होणाऱ्या अमिनो अ‍ॅसिडमुळे विषारी घटक तयार होतात. ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. 

अंडे आणि केळे

काही जण नाश्त्यामध्ये अंड्यासह केळे खाणे आवडीने खातात. पण दोन्ही पदार्थ एकत्रित खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अंड्यामध्ये प्रोटीन तर केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाल्ल्यास पोट जड होते आणि पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. 

अंडे आणि चहा 

सकाळच्या नाश्त्यामध्ये काही लोक गरम चहासोबत अंड्याचे सेवन करतात. पण हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कारण अंडे आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास प्रोटीनचे मूल्य कमी होते. तसंच यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 

अंडे आणि दुग्धजन्य पदार्थ 

अंड्यासह दूध, दही, पनीर आणि चीज सेवन करू नये. अंड्यासह दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास शरीर जड होते. यामुळेही अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेची यासारख्या समस्याही उद्भवतात.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

Pune News: बनावट गॅझेटचा आधार घेत धाकट्या भावाची जमीन हडपली; बारामतीतील धक्कादायक प्रकार, महसूल यंत्रणेच्या हलगर्जीपणातून जमीन घोटाळा

SCROLL FOR NEXT