health update Vikas Singh writes Sitting lifestyle and weight
health update Vikas Singh writes Sitting lifestyle and weight sakal
आरोग्य

बैठी जीवनशैली आणि वजन!

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही सक्रिय असताना किंवा विश्रांती घेत असताना, तुमचे शरीर अजूनही ऊर्जा वापरत असते, ऑक्सिजन शरीरात घेते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. मात्र, विश्रांती आणि हालचाल करताना तुम्ही किती ऊर्जा किंवा ऑक्सिजन घेता यात फरक आहे.

- विकास सिंह, संस्थापक, ‘फिटपेज’ ॲप

आपल्या आई-वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या तुलनेत, आपण अशा सवयीमध्ये जास्त वेळ घालवतो, ज्यामध्ये शारीरिक हालचाली केवळ कमी होत नाहीत, तर अधिक काळ घर, कार्यालय आणि क्लबमध्ये फक्त बसून राहणे वाढते. तंत्रज्ञानातील प्रगतीने असे वातावरण तयार केले आहे, जे अधिक बसून आणि कमी हालचाल करण्यास प्रोत्साहन देते.

आपण आता संपूर्ण दिवस टीव्ही पाहण्यात, व्हिडिओ गेम खेळण्यात, खाण्यात, घरी बाहेरून जेवण मागवण्यात आणि अर्थातच डेस्कवर काम करून बसून घालवू शकतो. शिवाय, शाळा, ऑफिस आणि विविध सार्वजनिक ठिकाणे अशा प्रकारे डिझाइन केली आहेत की तिथे कार, बस, लिफ्ट, एस्केलेटरची सोय असल्याने शारीरिक हालचाल अधिकच कमी होते.

जास्त वेळ बसल्याचे परिणाम

अनेकांना हे माहीत आहे, की जास्त बसणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. मात्र, हे केवळ अंशतः सत्य आहे. जेवताना, विश्रांती घेताना किंवा प्रवास करताना आपला बहुतेक वेळ बसण्यात जाणे साहजिक आहे, परंतु अधिक काळ बसून राहणे ही समस्या बनू शकते. दीर्घकाळ बसणे विविध आरोग्यविषयक गुंतागुंताींशी जोडलेले आहे जसे की :

  • वजन वाढणे : तुमचे शरीर चालणे, उभे राहणे आणि अजून बऱ्याच हालचाली करण्यासाठी ऊर्जा वापरते. जेव्हा तुम्ही जास्त वेळ बसता तेव्हा तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी वापरली जाते. परिणामी तुम्ही कमी कॅलरीज जाळता ज्यामुळे लठ्ठपणा आणि लठ्ठपणा-संबंधित समस्यांचा धोका वाढतो.

  • तुम्ही स्नायूंचा तितकासा वापर करत नसल्यामुळे तुम्ही त्यांची देखील ताकद गमावू शकता.

  • तुमची हाडे कमकुवत होऊ शकतात.

  • चुकीच्या आसनामुळे तुमच्या नितंब, पाठ आणि मानेमध्ये त्रास होतो.

  • टाइप २ मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढतो.

  • वेदनादायक आणि अनियमित मासिक पाळी

  • याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

दीर्घकाळ बसणे ही समस्या का आहे?

तुम्ही सक्रिय असताना किंवा विश्रांती घेत असताना, तुमचे शरीर अजूनही ऊर्जा वापरत असते, ऑक्सिजन शरीरात घेते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. मात्र, विश्रांती आणि हालचाल करताना तुम्ही किती ऊर्जा किंवा ऑक्सिजन घेता यात फरक आहे. उदाहरणार्थ, तुमचे वजन ६० किलो असल्यास, तुम्ही विश्रांतीच्या वेळी प्रति मिनिट २१० मिली (६० किलो x ३.५ मिली) ऑक्सिजन वापरता. मात्र, तुम्ही चालत असताना किंवा उभे असताना, तुमच्या हालचालीच्या तीव्रतेनुसार तुम्ही वापरत असलेला ऑक्सिजन जास्त असेल.

ऑक्सिजनचे प्रमाण जितके जास्त तितकी तुमच्या शरीराला त्या क्रियाकलापासाठी अधिक ऊर्जा लागेल. बसताना, ऑक्सिजनचे सेवन कमी होते आणि तिथूनच समस्या सुरू होते कारण तुमचे शरीर कमी ऊर्जा वापरते. उदाहरणार्थ, एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक डेस्क जॉब करतात त्यांच्या तुलनेत कृषी कामगार १००० जास्त कॅलरीज बर्न करू शकतात. कारण हे कामगार दिवसाचा अधिक वेळ चालण्यात आणि उभे राहण्यात घालवतात.

सक्रिय कसे राहायचे?

  • सकाळी किमान १५-२० मिनिटे चाला.

  • तुम्हाला शक्य असेल तिथे लिफ्टऐवजी पायऱ्या वापरण्याचा प्रयत्न करा. ऑफिसच्या वेळेत, दर ३० मिनिटांनी जागेवरून उठा किंवा चाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना कॉल किंवा मेसेज करण्याऐवजी त्यांच्याशी त्यांच्या जागेवर जाऊन बोला आणि स्वतःला सक्रिय ठेवा.

  • फोनवर बोलत असताना चाला

  • रात्रीच्या जेवणानंतर तुमच्या घरच्यांबरोबर फिरायला जा.

  • टीव्ही पाहताना, प्रत्येक ब्रेकवर उभे राहा, फिरा.

  • रविवार आराम करण्याऐवजी, ट्रेकला जा किंवा तुमच्या कुटुंब आणि मित्रांसह फिरा.

  • तुमच्या मुलांसोबत १५-२० मिनिटे खेळा

  • तुमचा आवडता खेळ खेळा किंवा नृत्य करा.

  • तुम्ही किती पावले चाललात हे देखील रेकॉर्ड करू शकता आणि स्वतःसाठी एक लक्ष्य ठरवू शकता. उदाहरणार्थ, दिवसाला ५००० पावले चाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT