health news
health news  sakal
आरोग्य

Uric Acid Gout : शरीरात ‘यूरिक ॲसिड’चे प्रमाण वाढण्याची कारणे कोणती ? ते कसे रोखावे

सकाळ वृत्तसेवा

Uric Acid Gout - आजकाल बऱ्याच लोकांमध्ये यूरिक ॲसिड वाढून त्यामुळे निर्माण होणाऱ्या सांधेदुखीचा त्रास आढळून येतो. शरीरामध्ये प्युरीन घटकांच्या चयापचयानंतर यूरिक ॲसिड टाकाऊ घटक म्हणून निर्माण केले जाते.

निरोगी स्थितीमध्ये हे यूरिक ॲसिड रक्तामध्ये विरघळून किडनीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. त्यामुळे त्याचा कोणताही त्रास जाणवत नाही. परंतु, जेव्हा यूरिक ॲसिड अतिरिक्त प्रमाणात तयार होते व त्याचे रक्तातील प्रमाण वाढू लागते, या अवस्थेला “हायपर यूरिसेमिया” असे म्हणतात.

हे यूरिक ॲसिड सांध्यांच्या ठिकाणी जमा होऊन सांध्यांमध्ये सूज, लालसरपणा व वेदना निर्माण करते, यालाच “गाऊट” असे म्हणतात. किंवा हे यूरिक ॲसिड किडनीमध्ये साठून राहिले तर किडनी स्टोनचा-मूतखड्याचा त्रास होतो.

शरीरात ‘यूरिक ॲसिड’चे प्रमाण वाढण्याची बरीच कारणे आहेत. जसे की,

१) अनुवंशिकता : बऱ्याचदा यूरिक ॲसिडचा आजार कुटुंबामध्ये असतो. (फॅमिली हिस्टरी)

२) आहार : आहारामध्ये सी फूड, मटण, प्रोसेस्ड फूड, जंक फूड, हाय फ्रुक्टोझ सिरप वापरलेले बाजारातील पदार्थ खाण्यात जास्त असतील तर यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढते.

३) मद्यपान : मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये गाऊटचे प्रमाण जास्त आढळून येते.

४) स्थूलता : स्थूल लोकांमध्ये सामान्य वजनाच्या माणसांच्या पेक्षा गाऊटचे प्रमाण जास्त असते. ज्या लोकांमध्ये पोटावरील चरबीचे प्रमाण जास्त असते (विसरल फॅट) त्यांच्यामध्ये यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढून गाऊट होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.

युरिक ॲसिड वाढू नये म्हणून किंवा ज्यांचे जास्त वाढलेले आहे, त्यांनी खालील काळजी घ्यावी...

१) भरपूर पाणी प्यावे : पाण्यामुळे अतिरिक्त प्रमाणात तयार झालेले यूरिक ॲसिडचे खडे बाहेर टाकले जातात. त्यामुळे ते एकाच ठिकाणी साठून राहत नाहीत.

२) वजन नियंत्रणात ठेवणे : नियमित व्यायाम व सर्व पोषक घटकांनी युक्त समतोल आहार घेऊन हळूहळू वजन कमी करावे. झटपट वजन कमी करण्यासाठी फॅट डायट किंवा उपासमार केल्यामुळे यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. आहारामध्ये अ, ब, ई आणि क जीवनसत्व जास्त असलेले पदार्थ, जसे की लिंबूवर्गीय फळे, आवळा आणि ओमेगा थ्री, मेदाम्ल असलेले जवस, भोपळा बी खाण्यात ठेवावे.

३) ज्वारी, बाजरी, नाचणी यांची भाकरी खाण्यात ठेवावी. हे पदार्थ अल्कधर्मी असल्यामुळे यूरिक ॲसिडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

४) स्ट्रॉबेरी, चेरी व यांसारखी फळे गाऊटमध्ये खाणे फायदेशीर ठरतात. यामध्ये असलेले पोषक तत्त्व यूरिक ॲसिडचे खडे सांध्यांमध्ये साठू देत नाहीत.

५) खालील पदार्थ टाळावेत : ज्यामध्ये प्युरीन जास्त प्रमाणात आहे, जसे की मटण, मटणाचा रस्सा, मशरूम, खाणे टाळावे.

६) मद्यपान वर्ज्य करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT