healthy Diet For Dengue Fever Patients health sakal article Sakal
आरोग्य

Dengue : डेंगीच्या रुग्णांसाठी आहाराची काळजी

हळदीचे साय काढलेले दूध हळद वरून टाकावी. दूध उकळत असताना टाकू नये त्याने हळदीची पोषण तत्त्वे कमी होतात.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. कोमल बोरसे

आपण गेल्या भागात डेंगीच्या आजाराबद्दल माहिती घेतली. या आजारात कोणते पदार्थ टाळावेत याची माहिती घेणार आहोत. प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ टाळावेत. कारण ते लक्षणे वाढवू शकतात. कॅफीन, कॉफी आणि अल्कोहोलपासून दूर रहा.

कच्चे किंवा कमी शिजवलेले पदार्थ खाऊ नका कारण ते दूषित असू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढवू शकतात. एकावेळी जास्त खाऊ नका कारण यामुळे पचनसंस्थेवर अनावश्यक ताण पडतो आणि बरे होण्यास विलंब होतो. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय आहारातील पूरक किंवा हर्बल उपचार घेऊ नका

डेंगी तापासाठी आहार तक्ता

सकाळी उठल्यानंतर ः गरम पाणी त्यामध्ये जिरे पावडर वापरू शकता.

नाश्ता ः घरी बनवलेले इडली, डोसा, मऊ उपमा

सकाळी ११ वाजता ः कोणतेही एक फळ, संत्रे, ड्रॅगन फ्रूट, पपई, अंजीर, डाळिंब किंवा नारळ पाणी, लिंबू पाणी

दुपारचे जेवण ः कफ नसेल तर दहीभात किंवा वरण-भात, कमी तिखट आणि कमी तेलाचे भाज्या, भाज्यांचे सूप लिंबू टाकून घेणे. दही किंवा ताक एक वाटी.

संध्याकाळी चार वाजता ः मुगाचे किंवा कुळथाचे कढण, चिकन सूप, सूप पिताना वरून थोडेसे मिरेपूड सुंठ टाकावे म्हणजे घशाला गरम लागून छान छान आराम मिळेल शिजत असताना मिरे, सुंठ पावडर वापरू नये त्याने जळजळ आणि तिखट जास्त लागू शकते.

झोपताना ः हळदीचे साय काढलेले दूध हळद वरून टाकावी. दूध उकळत असताना टाकू नये त्याने हळदीची पोषण तत्त्वे कमी होतात. वरील आहार तक्ता हा नॉर्मल डेंगी रुग्णासाठी आहे. त्याला मधुमेह, रक्तदाब, किडनीचा विकार नाही अशांसाठी आहे.

रुग्णासाठी सूप नेहमी घरी बनवावे बाजारात मिळणाऱ्या पावडरपासून बनवलेले सूप पिण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामध्ये पोषण तत्त्व कमी आणि प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स फ्लेवर्स जास्त असतात.

घरी बनवलेला शेव नसलेला मुरमुऱ्यांचा चिवडा, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, मखाणा आणि एक फळ रात्रीचे जेवण मुगाच्या डाळीची खिचडी ज्यामध्ये अर्धी मूगडाळ आणि अर्धे तांदूळ असावे खिचडी मऊ असावी. त्यामुळे पाणी जास्त वापरावे त्यामध्ये भाज्याही वापरू शकता सोबत सूपही घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT