Healthy Lifestyle sakal
आरोग्य

Healthy Lifestyle : तुम्ही खरंच हेल्दी आहात? कसं ओळखाल?

या कारणांमुळे तुम्ही हेल्दी आहात का? हे जाणून घेण्यास सोपी जाणार.

सकाळ डिजिटल टीम

Healthy Lifestyle : काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडेही जातात पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया. या कारणांमुळे तुम्ही हेल्दी आहात का? हे जाणून घेण्यास सोपी जाणार. (Healthy Lifestyle are you healthy read story)

१) तुमचा आहार योग्य आहे का ?

आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.

२) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का?

आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे.

३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय ना ?

आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

४) तुम्हाला पुरेशी झोप मिळते आहे का ?

आपले शरीर हे कोणत्याही रोगविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.

५) तुम्ही तोंडाची नीट स्वच्छता करता ना ?

आपले तोंड हा अनेक बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात.

६) तुमच्या कुटुंबात कुणी सतत आजारी पडते का?

अनेकवेळा असे दिसून आले आहे की रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात त्यांची संख्या जर कमी असेल तर तो माणूस सतत आजारी पडतो.

७) तुम्हाला ताण आहे का ?

आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे जवळपास अशक्य आहे. पण जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल तर त्यामुळे आपल्या शरीराची खूप हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.

- डॉ. अमित भोरकर

आहारतज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमदार कल्याणशेट्टींना मिळणार वाढीव पोलिस बंदोबस्त! जीवे मारण्याच्या धमकीनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयाने मागविला अक्कलकोट उत्तर पोलिसांकडून अहवाल, वाचा...

माझी भूमिका : ‘वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल’

१३ ऑगस्ट २०२६ पंचांग! श्रावणमासाला आजपासून सुरुवात; जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

आजचे राशिभविष्य - 13 ऑगस्ट 2026

Green Moong Dal Ladoo: साखर-गूळ नाही तरी चव भन्नाट! असे बनवा हिरव्या मूगडाळीचे प्रोटीनयुक्त लाडू

SCROLL FOR NEXT