Healthy Lifestyle
Healthy Lifestyle sakal
आरोग्य

Healthy Lifestyle : एक्सपर्ट म्हणतात, "डाएट करू नका..."

सकाळ डिजिटल टीम

बदलत्या राहणीमानानुसार हल्ली लठ्ठपणासारख्या समस्या वाढल्या आहेत. यासाठी फक्त अनेकजण डाएट करणे हा पर्याय निवडतात पण खरंच डाएट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याविषयी एक्सपर्टचं काय म्हणणंं आहे, हे जाणून घेऊया. ( Healthy Lifestyle expert said do not do diet read story )

एक्सपर्ट म्हणतात, आपल्या शरीराचं वजन दोन प्रकारचं असतं- चरबीचं वजन आणि स्नायू - हाडांचं वजन. वजन काट्याकडे बघून स्वत : च्या प्रकृतीचा अंदाज बांधता येत नाही. आपल्या शरीरातल्या चरबीचं वजन किती आहे, हे एकूण वजन किती आहे याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं. एकूण वजनात चरबीच्या वजनाचं प्रमाण किती आहे हे पाहिलं जात नाही आणि आपण उगाच डाएट च्या मागे लागतो.

एक्सपर्टच्या मते अतिरेकी डाएटच्या मागं कधीही लागू नका, त्यांचा फारसा उपयोग नसतो आणि ती पाळणंही अवघड असतं.सर्व खाल्लं पाहिजे . खाद्यपदार्थांवर 'दैवी','असुरी' असे शिक्के मारू नका, सर्व पदार्थ तुमच्यासाठी तेवढेच चांगले किंवा वाईट असतात.

प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी असते, तसं प्रत्येक व्यक्तीचं डाएटही वेगळं असलं पाहिजे. दुसऱ्या कुणाचं तरी डाएट, व्यायाम याचं अनुकरण करू नका. लो-फॅट किंवा शुगर फ्री पदार्थांत नेमकं काय असतं ते माहीत करून घ्या. तसे सगळेच पदार्थ आरोग्यदायी असतात, असं नाही आणि ते (कधीही) प्रमाणाबाहेर खाऊ नका.

व्यायामाला पर्याय नाही. कितीही चांगली आहारपद्धती असली, तरी व्यायाम केल्याशिवाय हवा तो परिणाम साध्य करता येणार नाही. आहार जर सुयोग्य असेल तर औषधांची गरज भासत नाही.

एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्या कारणांमध्ये आहारविषयक चुका हे सर्वांत जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून विचार करायच्या आधी आहारीय बदल महत्त्वाचा ठरतो.

त्यामुळे कधीही डाएटवर जाऊ नका त्याऐवजी जीवनशैली बदला. डाएटिंग म्हणजे उपासमार नव्हे वजन कमी करायचं असेल किंवा शरीराची झीज भरून काढायची असेल तर खाल्लं पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; अल्लू अर्जुन, ज्यु. एनटीआरने केलं मतदान

मतदार यादीतून तुमचे नाव वगळले आहे का? 2 कागदपत्रांसह ‘येथे’ फार्म नंबर-6 भरा, 7 दिवसात समाविष्ठ होईल नाव; लोकसभेला मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी

Sakal Podcast: महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

Latest Marathi News Live Update : राज्यभरात वळवाचा दणका सुरूच, बहुतांश ठिकाणी आजही ढगाळ हवामान

नवीन शिक्षकांना ‘पुन्हा बदली मागणार नाही’ असे लेखी देण्याचे बंधन! विनंती बदल्यानंतर नवीन भरती झालेल्यांना नियुक्ती; विनंती बदलीसाठी 3000 अर्ज

SCROLL FOR NEXT