Heart Attack sakal
आरोग्य

Heart Attack: 'या' ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका

काही ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो, असे संशोधनातून समोर आले

सकाळ डिजिटल टीम

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात माणूस स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. तुमच्या जीवनशैलीत छोट्या छोट्या बदलांचा तुमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होतो. जसे की हल्ली हार्ट अटॅकचेही प्रमाण वाढले आहे. अगदी तरुण वयातील मुलांनाही हार्ट अटॅक येतोय.

खरं तर काही रिसर्चमधून हार्ट अटॅकबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. या रिसर्चच्या मते काही ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असतो. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (healthy lifestyle people having these blood group have more heart attack risk)

ओ ब्लड ग्रुप असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका कमी

ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप ‘O’ असतो. त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. याशिवाय इतर ब्लड ग्रुपच्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो. शास्त्रज्ञांच्या मते ब्लड ग्रुप ‘O’ मध्ये ब्लड सर्कुलेशन उत्तम असतं.

A, B आणि AB ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका

A, B आणि AB ब्लड ग्रुपच्या लोकांच्या शरीरात ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत नाही कारण त्यांच्यात रक्त गोठण्याचे प्रथिने जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका सर्वाधिक धोका असतो.

या सर्व ब्लड ग्रुपच्या लोकांनी स्वत:ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तम आहार करणे सुद्धा चांगले असते. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली होती त्यानंतर र्टेरियोस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस, वैस्कुलर बायोलॉजी व अमेरिकन हार्ट एसोसिएशन (एएचए) मध्ये प्रकाशित केलेल्या जर्नलमध्येही ही बाब समोर आली आहे.

या दोन्ही रिसर्च अभ्यासात समोर आले आहे की AB ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता 23 टक्के अधिक असते तर  A किंवा B ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ८ टक्क्यांनी जास्त असतो.

याशिवाय  A ब्लड ग्रुप लोकांमध्ये हार्ट फेल्युअरचा धोका O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत 11 टक्क्यांनी जास्त असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT