Heart Attack  google
आरोग्य

Heart Attack : ....म्हणून तरुणांमध्ये वाढतोय हृदयरोग; अशी घ्या काळजी

साथीच्या आजारानंतर हार्ट थ्रोम्बोसिसची समस्या खूप वाढली आहे.

नमिता धुरी

मुंबई : हल्ली आठवड्याभरात हृदयविकाराचा झटक्याची एखादी तरी घटना आपल्याला कानी ऐकू येते. नुकतेच याचा विळखा तरुण पिढीला अधिक पडला आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव व व्यग्र जीवनशैली (Lifestyle) यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

पण यात नुकतेच एक कारण असे समोर आले आहे की, कोरोनाच्या नंतर हृदयविकाराचे प्रमाण अधिक वाढले. परंतु, कोरोनामुळे हृदयविकार (Heart attack) वाढण्याचे कारण काय ?

याविषयी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साथीच्या आजारानंतर हार्ट थ्रोम्बोसिसची समस्या खूप वाढली आहे. त्यामुळे हल्ली अनेक तरुणांचे मृत्यूही होत आहेत. थ्रोम्बोसिस म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे. यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्त नीट वाहत नाही, त्यामुळे अटॅक येण्याचा धोका असतो.

थ्रोम्बोसिसमुळे हृदयविकाराचा झटका येतो असे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय थ्रोम्बोटिक स्ट्रोक देखील होऊ शकतो. या दोन्हीमुळे अचानक मृत्यू होऊ शकतो. कोविडमुळे गंभीर आजारी झालेल्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे.

राजीव गांधी रुग्णालयातील कार्डिओलॉजी विभागाचे डॉ. अजित जैन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महासाथीमुळे हृदयाशी संबंधित आजारही कोविडची दीर्घकाळ चालणारी समस्या बनत आहेत. व्हायरसने हृदयाचे अनेक प्रकारे नुकसान केले आहे, त्यामुळे थ्रोम्बोसिस ही एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. त्यामुळे हृदयाचे नुकसान होत आहे.

मानसिक समस्यांची वाढती प्रकरणे

डॉ जैन यांच्या म्हणण्यानुसार, कोविड महासाथीपासून तरुणांमध्ये मानसिक तणाव खूप जास्त दिसत आहे. वाढत्या तणावामुळे हृदयाशी संबंधित आजारही होतात. हृदयविकार वाढण्यामागे खराब मानसिक आरोग्य हे देखील एक कारण आहे. याशिवाय मधुमेह आणि लठ्ठपणामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो.

साखरेची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा वाढत आहे. अनेक प्रकरणांमध्ये, कमी वयात लोकांची कोलेस्टेरॉलची पातळी वाढत आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वाढत्या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

डॉ. जैन म्हणतात की हृदयविकार टाळण्यासाठी, लोकांनी दर तीन महिन्यांनी हृदय तपासणी करून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी लिपिड प्रोफाइल चाचणी आणि छातीची सीटी करणे अधिक चांगले आहे. हे अतिशय अचूक माहिती देते. जर शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल किंवा स्कॅनमध्ये हृदयाच्या कोणत्याही धमनीत ब्लॉक दिसून येत असेल तर अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करा

  • आहारात प्रथिने जीवनसत्त्वांचा समावेश करा आणि चरबी घेणे टाळा

  • धूम्रपान आणि दारूचे व्यसन टाळा

  • ताण घेऊ नका

  • जंक फूड टाळा आणि फळांचा आहारात समावेश करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT