heart health update Special plan Care Heart for heart patients doctor Sakal
आरोग्य

Care Heart : ह्दयरुग्णांसाठी ‘केअर हार्ट’चा विशेष प्लॅन बाजारात

हृदयरुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियांसाठी ‘केअर हार्ट’ मेडीकल विमा पॉलिसी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : हृदयरुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियांसाठी ‘केअर हार्ट’ मेडीकल विमा पॉलिसी बाजारात आली आहे. या पॉलिसीमध्ये पूर्वीच्या शस्त्रक्रियांसाठी लागणारा पैसा देखील देण्याची तरतूद केली गेली आहे. या पॉलिसीमुळे संबंधित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षा कवच लाभले आहे.

‘केअर हार्ट’ या पॉलीसीअंतर्गत जे हृदयरुग्ण आजारासह ॲंजिओप्लास्टी, ॲंजिओग्राफी, बायपास शस्त्रक्रिया याला सामोरे गेले आहेत. त्यांना पुढील कालावधीसाठी लागणाऱ्या संभाव्य उपचारासाठीचा दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ज्या रुग्णांचे ह्दयसंबंधीत शस्त्रक्रिया झाल्यापासून सात वर्षाच्या आत या पॉलिसीचा लाभ घेता येतो.

पॉलिसी घेतल्यानंतर पुन्हा हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठीचा खर्च या पॉलीसीअंतर्गत दिला जातो. ही पॉलिसी एक किंवा कुटुंबातील जास्तीत जास्त ६ सदस्यांसाठी घेतली जाऊ शकते. पॉलीसीधारकास ह्दयरोगाची हिस्टरी असायला हवी. वार्षिक हृदय तपासणीची सुविधा देखील पॉलीसीअंतर्गत वापरता येते. इतर आजारही झाले, तरी पॉलिसी घेतल्यानंतर दोन वर्षांनी इतर आजाराचे कव्हर लागू होते. यामध्ये हार्निया, मोतीबिंदू, मणके, प्रोस्टेट, किडनी आदीच्या शस्त्रक्रियांचा देखील समावेश संरक्षणात केला जाऊ शकतो.

हृदय हार्ट प्लॅन पॉलिशीची वैशिष्ट्ये

- इमपेशंट केअरची सुविधा

- प्री व पोस्ट हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची तरतूद

- ॲम्ब्युलन्स खर्चाची तरतूद

- कार्डियाक हेल्थ चेकअपची सुविधा

- आयुर्वेद, युनानी, सिद्ध व होमिओपॅथीच्या उपचाराच्या खर्चाची तरतूद

- नो क्लेम बोनसचा लाभ

-३,५,७ व १० लाखांचे प्लॅन उपलब्ध

केस हिस्टरी

एखाद्या ५० वर्षे वयाच्या ॲंजीओप्लास्टी, ॲंजीओग्राफी किंवा बायपास झालेल्या व्यक्तीला सहभागी होता येईल. त्याला वार्षिक प्रिमीयम १९ हजार रुपये एवढा असेल. सर्व प्रकारच्या हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी हॉस्पिटल खर्चाची ३ लाखाची तरतूद होते. तसेच त्यामध्ये तीन लाख रुपये वाढवले जातात.

केअर हार्ट प्लॅन हा विशेष करून ह्दयरुग्णांच्या पुढील उपचारासाठी आर्थिक संरक्षण देणारा आहे. दोन वर्षानंतर इतर आजाराचे कव्हर त्यात असणार आहे. तसेच वैद्यकीय सुविधांच्या खर्चासोबत वार्षिक कार्डियाक तपासणीची त्यात तरतूद आहे.

- देवकी मिठापल्ली, ज्यू.सेल्स ऑफिसर, केअर हेल्थ इन्शुरन्स, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT