Heat Wave esakal
आरोग्य

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Heat Wave : ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ चा प्रभाव कमी झाल्यामुळे आता विदर्भात अपेक्षेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Heat Wave : ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ चा प्रभाव कमी झाल्यामुळे आता विदर्भात अपेक्षेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मंगळवारपासून तापमान वाढून उन्हाचे तीव्र चटके जाणवणार आहेत. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे.

शहरात सोमवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र दुपारनंतर सूर्य तापून ऊन वाढले. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. पावसामुळे रविवारी ३७.४ अंशांपर्यंत घसरलेला पारा सोमवारी २.७ अंशांनी चढून ४०.१ अंशांवर गेला.

अकोला सर्वाधिक हॉट

विदर्भात सर्वाधिक ४२.३ अंश सेल्सिअसची नोंद अकोला येथे करण्यात आली. गोंदियाचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा चाळीशीवर गेला.

दिवसभर घामाच्या धारा

सूर्य तापू लागल्याने उन्हासोबतच उकाडा वाढला आहे. दिवसभर शरीरातून घामाच्या धारा वाहिल्या. शिवाय गर्मीमुळे चिडचिडेपणाही वाढला आहे. विक्रमी व कडक उन्हासाठी प्रसिद्ध असलेला मे महिना चोवीस तासांवर येऊन ठेपल्यामुळे, या आठवड्यात सूर्यनारायण उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.

सावधगिरी बाळगण्याची गरज

तापमानवाढ झाल्यास उष्माघाताचे बळी वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे. कडक उन्हामध्ये दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

विदर्भातील तापमान

शहर तापमान

नागपूर ४०.१

वर्धा ४१.०

अकोला ४२.३

बुलडाणा ४०.४

यवतमाळ ४१.२

गोंदिया ३८.२

ब्रह्मपुरी ४२.०

चंद्रपूर ४१.८

गडचिरोली ४०.२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस, जोतिबा डोंगरावर वीज कोसळून ५ जण जखमी

सोलापूरकरांसाठी खुशखबर! सोलापूर-हैदराबाद विमानसेवेचे आजपासून बुकिंग, १७ एप्रिलला पहिले उड्डाण; तिरुपती विमानसेवा कधी? वाचा...

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

Pune PMC Promotion Race: अतिरिक्त आयुक्तपदासाठी पुणे मनपातील चार वरिष्ठ अधिकारी दावेदार; पदोन्नती प्रक्रिया, सत्ताधाऱ्यांची संमती व नगरविकास विभागाची मंजुरी ठरणार निर्णायक

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

SCROLL FOR NEXT