Heavy Rain esakal
आरोग्य

Heavy Rain : पावसाला हलक्यात घेऊ नका..! मुसळधार पावसात भिजल्यानंतर आरोग्याची ‘अशी’ घ्या काळजी

Heavy Rain : देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Heavy Rain : देशातील अनेक भागांमध्ये सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही राज्यांमध्ये तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मुंबई, कोकणासह इतर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाळ्यात अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे, पावसापासून जमेल तितकी काळजी घ्या आणि पावसात अजिबात भिजू नका. पावसात भिजल्यामुळे, सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्य उद्भवतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला पावसात भिजल्यानंतर लगेच कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? त्याबद्दल सांगणार आहोत.

शरीर कोरडे करा

पावसात भिजल्यानंतर सर्वात आधी तुमचे ओले कपडे काढून तुमचे शरीर टॉवेलच्या मदतीने पूर्णपणे कोरडे करून घ्या. टॉवेलने अंग कोरडे केल्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करा.

ओले कपडे लगेच बदला

पावसात भिजल्यानंतर ओले कपडे घालणे टाळा. ते कपडे लगेच बदला. ओल्या कपड्यांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय, पावसामुळे अंग भिजलेले असते, त्यामुळे, थंडी वाजून येते. अशा स्थितीमध्ये कपडे बदलून गरम पाण्याने अंघोळ करा. त्यानंतर, कोरडे कपडे घाला.

आराम करा

पावसात भिजल्यानंतर थोडी विश्रांती घ्या. तुमचे शरीर ऊबदार ठेवण्यासाठी ब्लॅंकेट घेऊन झोपा. एसी आणि फॅन अजिबात लावू नका.

गरम अन्नाचे सेवन करा

पावसात भिजल्यानंतर नेहमी गरम अन्नाचे सेवन करणे, महत्वाचे आहे. कारण, पावसामुळे शरीराला थंडी वाजते, त्यामुळे, शरीर ऊबदार ठेवण्यासाठी गरम अन्नाचे सेवन जरूर करा. गरम अन्नाचे सेवन केल्याने शरीर ऊबदार राहते शिवाय, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

गरम पाणी अवश्य प्या

पावसाळ्यात खरं तर सर्वांनी गरम पाणी पिणे गरजेचे आहे. यामुळे, विविध संसर्गांपासून बचाव होण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही अचानक पावसात भिजता तेव्हा तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही घरी आल्यानंतर गरम पाणी प्या. यामुळे, शरीराला उष्णता मिळते थंडीचा धोका ही कमी होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT