Here is information about how should diet for children health sakal
आरोग्य

Diet For Children : पाल्याचा आहार

बालकांसाठी आहार कसा असावा

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. कोमल बोरसे

Diet For Children : आ पण बालकांसाठी आहार कसा असावा याविषयी माहिती घेऊ. आपण सहा महिन्यांच्या बाळापासून ते पाच वर्षांच्या बाळासाठी कोणत्या पोषक द्रव्यांची गरज असते व त्यासाठी कसा आहार घ्यावा या विषयी माहिती बघू

तुम्हाला तुमच्या बाळामध्ये खालील लक्षणे दिसतात का?

त्वचा व केसांमध्ये बदल ः

त्वचा पांढरी दिसणे हे ॲनिमिया म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे होते. त्वचेमध्ये पांढऱ्या रंगाचे चट्टे उठणे हे शरीरातील कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे होते.

केस पांढरे होणे किंवा रुक्ष होणे ः

हे लोह, प्रथिने, कॉपर आणि झिंक यांच्या कमतरतेमुळे होते.

जखम लवकर बरी न होणे ः

एखाद्यावेळेस बाळ खेळताना पडले किंवा आगीचा चटका बसला तेव्हा जी नवीन त्वचा येते ती प्रथिनांमुळे येते शरीरात प्रथिनांची कमी असेल तर नवीन त्वचा आणि जखम भरून यायला वेळ जास्त लागतो.

शाळेत लक्ष न लागणे किंवा स्मरणशक्ती कमी असणे ः

मुलांचा शाळेत जो अभ्यास घेतला जातो किंवा जे शिकवले जाते ते त्यांना समजून घ्यायचा असेल तर त्यांचं पोट रिकामे नसावे. उपाशीपोटी शिकवलेले नीट समजत नाही व ते लक्षातही राहत नाही. त्यामुळे मुलांना पोषक नाश्ता करूनच शाळेत पाठवावे. तसेच मुलांची स्मरणशक्ती वाढवायची असल्यास आहारामध्ये लिनोलिक असेल डीएचए ओमेगा-३ ओमेगा-६ असावे.

सारखे सर्दी-खोकला कफ होणे-सर्दी खोकला कफ या गोष्टींमुळे मुले शाळेतून सतत आणि सर्वाधिक सुट्टी घेतात. हे होऊ नये म्हणून झिंक, व्हिटामिन ‘सी’, आणि प्रथिने व बाळाचे योग्य वजन हे महत्त्वाचे आहे.

सारखे पोट खराब होणे, जुलाब-उलट्या होणे ः

पोटाचे विकार होऊ नये यासाठी स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे बाळाला लहानपणापासूनच हात धुणे, नखे कापणे यासारख्या सवयी लावाव्यात. बाहेरचे अन्न, डबाबंद पदार्थ, अस्वच्छ पाणी देऊ नये. ही सगळी रोग प्रतिकारशक्ती कमी असण्याची लक्षणे आहे. पुढील भागात रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय, यावर माहिती घेऊयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारुकांडातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत, महापालिकेत नोकरीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

Rajat Patidar: Dhoni रोहितची बरोबरी? फायनलपूर्वी RCB कर्णधार रजत पाटीदारने मनातील गोष्ट सांगितली म्हणाला मी कधी विचार..

Gemini Omni ने बदलली व्हिडिओ एडिटिंगची दुनिया; AI वापरुन मिनिटात बनवा हवा तसा व्हिडिओ, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT