High Blood Sugar In Kids esakal
आरोग्य

High Blood Sugar In Kids : लहान मुलांनाही होऊ शकतो का मधुमेह? ब्लड शुगर लेव्हल वाढताच दिसतात ही लक्षणं

प्रौढांमध्ये सामान्य असणारा हा आजार हल्ली लहान मुलांमध्येही वाढताना दिसतोय.

साक्षी राऊत

High Blood Sugar In Kids : हल्ली मधुमेह आजार फार सामान्य झालाय. जवळपास संपूर्ण लोकसंख्येतील प्रत्येक चौथा व्यक्ती हा मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहे. लठ्ठपणा, स्ट्रेस, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यांमुळे मधुमेहाचा धोका दुप्पट वाढतो. ज्यामुळे मनुष्याची इन्सुलिन लेव्हल नियंत्रणात राहत नाही. प्रौढांमध्ये सामान्य असणारा हा आजार हल्ली लहान मुलांमध्येही वाढताना दिसतोय. तेव्हा पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. मुलांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढल्यास खालील काही लक्षणे दिसून येतात.

मुलांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढल्यास दिसतात ही लक्षणे

जास्त तहान लागणे

ब्लड शुगर लेव्हल वाढल्यसा बहुतांश मुलांना फार जास्त तहान लागते. जर मुले फिजीकल अॅक्टिव्हिटीज न करता खूप जास्त पाणी पिताय तर हे हाय ब्लड शुगर लेव्हल वाढल्याचं लक्षण असू शकतं.

वारंवार लघवीला जाणे

ब्लड शुगर लेव्हल हाय झाल्यास मुले वारंवार लघवीला जातात. तेव्हा मुले नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला जात असेल तर वेळीच सावध व्हा. हे हाय ब्लड शुगरचं लक्षण असू शकतं.

भूक लागणे

मधुमेह असल्यास मुलांना वारंवार भूक लागते. मुले वारंवार जेवण मागतात.

अचानक वजन कमी होणे

टाइप -२ मधुमेह झाल्यास तुम्हाला भूक जास्त लागते. मुलांचे वजन अचानक कमी होते. यामागचे कारण म्हणजे बॉडी सेल्सना इन्सुलिन रेझिस्टंसमुळे ग्लूकोजमधून उर्जा मिळत नाही. आणि वजन झपाट्याने कमी होते.

कायम थकवा जाणवणे

मुले फार जास्त लवकर थकतात, चिडचिड करतात तेव्हा त्यांच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढल्याचे ते लक्षण असू शकते. (Health)

दृष्टी कमजोर होणे

मुलांचे दृष्टी कमजोर होणे, त्यांना अंधुक दिसणे अशी लक्षणं दिसत असतील तर त्यांची ब्लड टेस्टसुद्धा करून घ्या. हाय ब्लड शुगरची समस्या असलेल्या मुलांना दूरचे स्पष्ट दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT