आरोग्य

Health : वारंवार शरीरातील अवयवांना सूज येत असेल तर 'हे' घरगुती उपाय ट्राय करा

शरीरातील ही सूज दूर करण्यासाठी काही सामान्य घरगुती उपायांचा अवलंब केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

शरीरातील ही सूज दूर करण्यासाठी काही सामान्य घरगुती उपायांचा अवलंब केला जातो.

शरीरात जेव्हा सूज येते तेव्हा बहुतेकांच्या हात किंवा पायांना सुज आलेली दिसते. हाता-पायांना सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. शरीरातील ही सूज दूर करण्यासाठी काही सामान्य घरगुती उपायांचा अवलंब केला जातो. जर तुम्ही कोणत्याही तेलाने हातांना आणि पायांना मसाज करायला सुरुवात केली तर सूज निघून जाईल. मात्र बऱ्याचवेळा हा उपाय कमी येईल असे नाही.

शरीरातील काही अवयवांना आलेली सूज बरी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यासाठी वेगवेगळे घरगुती उपायही केले जातात. असे काही सोप उपाय काही तासांतच सुजलेल्या हात आणि पायांवर प्रभाव दाखवू लागतात. तसेच काही औषधी गुणधर्म असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने वेदनेपासून लवकर आराम मिळतो. आज आपण शरीरातील सूज कमी करण्यासाठी घरगुती उपाय पाहणार आहोत..

तुळस

आयुर्वेदात तुळशीला औषधाचा दर्जा देण्यात आला आहे. घसा दुखत असेल किंवा नाक बंद होत असेल तर तुळशीचा वापर केला जातो. यासाठी तुळशीचा काढा हा उत्तम असतो. त्याचप्रमाणे हात, पाय किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात सूज आली असेल तरीही तुम्ही तुळशीचे सेवन करू शकता. तुळशीच्या पानांपासून चहा करून पिल्याने शरीराला फायद्याचे ठरु शकते.

हळद

जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी हळदीचा वापर शतकानुशतके केला जात आहे. हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात आढळतो. तुमच्या अंगावर सूज येत असेल तर २ चमचे तिळाच्या तेलात एक चमचा हळद मिसळून सुजलेल्या भागावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल. याशिवाय हळदीचा डेकोक्शन किंवा हळदीचे दूधही काही वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

जायफळ

हात-पायांची सूज दूर करण्यासाठी जायफळ खाण्याची गरज भासते. यामध्ये अनेक नैसर्गिक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. जे वेदना दूर करण्यासाठी उपयोगी पडतात. ते लावण्यासाठी जायफळ पाण्यात बारीक करून त्याचा रस काढला जातो. दुखत असलेल्या भागावर मसाज करा.

मोहरीचे तेल

मोहरीचे तेल वेदना कमी करू शकते परंतु ते लावण्याची योग्य पद्धतही माहित असणे आवश्यक आहे. एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या. त्यात काही प्रमाणात ओवा मिक्स करून हे तेल गरम करा. या तेलाने सूजलेल्या भागांवर ५ ते १० मिनिटे मसाज करा. तुम्हाला आराम वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: शिक्षणासाठी पैसा खर्च करता, पण रोजगाराचे मार्ग बंद; हजार युवांपैकी फक्त १२ जणांना कायमची नोकरी, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Shirur News : हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु; महिलेच्या कुटूंबियांचा आक्रोश

ऐकावं ते नवलंच! श्वानासारखं दिसण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने खर्च केले तब्बल २२० कोटी रुपये; पाहा VIDEO

Shirur News : घोडनदीच्या पूलावरून पात्रात उडी घेतलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

Latest Marathi News Live Update : स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकलीचा मृत्यू, अमरावती जिल्ह्यातील घटना, पालक आक्रमक

SCROLL FOR NEXT