Home Remedies For Dehydration  esakal
आरोग्य

Home Remedies For Dehydration : डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'या' घरगुती उपायांची घ्या मदत, पाण्याची कमतरता होईल दूर

Home Remedies For Dehydration : उन्हाळा सुरू झाला की, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होऊ लागतो.

Monika Lonkar –Kumbhar

Home Remedies For Dehydration : उन्हाळा सुरू झाला की, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होऊ लागतो. डिहायड्रेशनची समस्या तर अनेकांना संभवते. डिहायड्रेशन म्हणजे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे. ही समस्या दूर करण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात पिणे आणि शरीर हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे.

आपले शरीर पाण्याशिवाय कार्य करू शकत नाही. उन्हाळ्यात जेव्हा आपले शरीर घाम आणि लघवीद्वारे द्रवपदार्थ बाहेर सोडते, तेव्हा डिहायड्रेशन होते. या स्थितीमध्ये शरीरात पाण्याची कमतरता असते.

यामुळे, अशक्तपणा येणे, थकवा, चक्कर येणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ही डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.

नारळ पाणी प्या

नारळ पाण्याला अमृत असे म्हटले जाते. नारळ पाणी प्यायल्याने आपले संपूर्ण शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. नारळ पाण्यात जीवनसत्वे आणि खनिजे यांचे विपुल प्रमाण आढळून येते. नारळ पाण्यातील सोडिअम, पोटॅशिअम हे घटक डिहायड्रेशनची समस्या कमी करू शकतात. त्यामुळे, उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

या दिवसांमध्ये शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही दिवसातून १ ग्लास नारळपाणी पिऊ शकता. यामुळे, तुम्हाला हायड्रेटेड वाटेल आणि शरीरात ऊर्जा टिकून राहील. (Drink Coconut Water)

ताक प्या

उन्हाळ्यात ताक हमखास प्यायले जाते. ताक प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. ताकामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक असते. ताकामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषकघटक ही आढळतात.

या घटकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे ताक प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी तुम्ही दिवसातून २-३ वेळा ताक पिऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात ताक मसाला किंवा जिरे पावडर ही घालू शकता. (drink buttermilk)

लिंबू पाणी प्या

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास लिंबू पाणी प्यायले जाते. लिंबू पाणी प्यायल्यावर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपल्याला फ्रेश वाटते. डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्या.

त्यामध्ये, आता लिंबाचा रस, पुदिन्याचा रस, काळे मीठ आणि मध मिसळा. हे सर्व मिश्रण चांगले मिसळा. हे पाणी तुम्ही दिवसातून २-३ वेळा पिऊ शकता. लिंबामध्ये पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअमसारखे घटक आढळून येतात. ज्यामुळे, डिहायड्रेशनची समस्या दूर होण्यास मदत होते. (Drink Lemon Water)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Himalayan Climate Change: हिंदुकुश हिमालयात हिमसाठ्यात घट; सलग चौथ्या वर्षी नीचांक, गंगा खोऱ्यात मात्र बर्फाचे प्रमाण अधिक..

Shahuwadi Crime News : शाहूवाडीत धक्कादायक प्रकार! लग्नाचे आमिष दाखवून वसीमने ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

शक्तिपीठ महामार्गामुळे दर वाढणार, जमीन खरेदी करायला लावून फसवणूक; खरातचा स्वत:च्या CAलाच पावणेनऊ कोटींचा गंडा

AI and post‑2000 era : दोन हजारोत्तरी काळ, डिजिटल क्रांती आणि एआयचा उदय; बदलत्या जगातल्या आपल्या जाणिवांचा वेध

Facebook Fraud Marriage : फेसबुकवरून ओळख, अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचा विश्वास; रायगडचे कुटुंब कोल्हापुरात आलं अन् घडलं भलतचं...

SCROLL FOR NEXT