Gastric Headache: Sakal
आरोग्य

Gastric Headache: तुम्हालाही पोटातील गॅसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय, मिळेल लगेच आराम

Home Remedies For Gastric Headache: जर तुम्हाला पोटातील गॅसमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर औषधे न घेता घरगुती उपाय करून ही समस्या दूर करू शकता.

Puja Bonkile

Home Remedies For Gastric Headache: अनेक लोकांना डोकेदुखीचा त्रास होतो. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. यात एक सामान्य कारण पोटातील गॅस असू शकते.

अनेकवेळा डोक्यात गॅस जमा होतात. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास खुप वाढतो. याशिवाय आंबट ढेकर येणे, उलट्यांचा त्रास होतो. अशावेळी अनेक लोक पेन किलर यासारखे औषधं घेतात. पण या औषधांच्या अतिसेवनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

तुम्ही पोटातील गॅसमुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी पुढील घरगुती उपायांचा वापर करू शकता. पुढील काही पदार्थांचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून लगेच आरम मिळू शकतो.

लिंबू पाणी

पोटातील गॅसमुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी लिंबू पाणी प्यावे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर यासारखे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे पचनसंस्था सुरळितपणे कार्य करते. तसेच डोकेदुखी कमी करते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करावा आणि सेवन करावे.

तुळस

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. याचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. तुळशीमध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते. तुम्हाला पोटातील गॅसमुळे डोकेदुखी होत असेल तर तुळशीचे पानं चावून खावे किंवा चहामध्ये टाकून सेवन करावे. यामुळे तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल.

ओवा

पोटाशी संबंधित समस्यांमध्ये ओवा खुप फायदेशीर ठरतो. त्यात थायमोल नावाचे एक संयुग वाढते, जे गॅसची समस्या कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला पोटातील गॅसच्या समस्येमुळे डोकेदुखी होत असेल तर अर्धा चमचा ओवा खाऊ शकता. यासाठी ओवा बारिक करावा नंतर थोडे काळे मीठ मिक्स करावे आणि कोमट पाण्यात टाकून सेवन करावे. असे केल्याने डोकेदुखी कमी होते.

कोल्ड पॅक

अनेकांना गॅसमुळे तीव्र डोकेदुखीला सामोरे जावे लागते. डोकेदुखी कमी करण्यासाठी बर्फाचा वापर करू शकता. यासाठी काही बर्फाचे तुकडे टॉवेलमध्ये गुंडाळा आणि 15 मिनिटे डोक्यावर ठेवा आणि परत काढा. ही प्रक्रिया पुन्हा करा. असे केल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळते.

आलं

पोटातील गॅसमुळे डोकेदुखी वाढल्यास तुम्ही आल्याचा चहा घेऊ शकता. हे करण्यासाठी, एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. त्यात एक इंच ठेचलेलं आलं घालून चांगले उकळावे. नंतर ते गाळून सेवन करावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात थोडे मधही घालू शकता. आल्यामध्ये अँटिऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे गॅस आणि डोकेदुखी दोन्हीपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT