Preventing Complications of Hypothyroidism with Hormone Therapy esakal
आरोग्य

Hormone Therapy : थायरॉईडच्या आजारावर हार्मोन थेरपी प्रभावी! काही डोसमध्ये व्हाल पूर्ण बरे,जाणून घ्या संपूर्ण माहिती

Thyroid Treatment : हार्मोन थेरपीमुळे हृदयविकार सारख्या आजाराची गुंतागुंत टाळण्यास मदत

सकाळ डिजिटल टीम

Thyroid Disorder : थायरॉईडची समस्या सध्या भारतात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जवळपास ४ कोटींहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त असल्याचा अंदाज आहे. थायरॉईड ग्रंथी ही आपल्या शरीरातील एक महत्त्वाची ग्रंथी असून ती शरीराच्या चयापचयासाठी आवश्यक असलेले थायरॉईड हार्मोन्स तयार करते. परंतु, कधी कधी ही ग्रंथी पुरेसे हार्मोन्स तयार करत नाही (hypothyroidism) किंवा अतिरिक्त हार्मोन्स तयार करते (Hyperthyroidism).

अशा वेळी हार्मोन थेरपी हा प्रभावी उपचार ठरू शकतो. डॉ. हर्षल चौधरी (सीएमई मर्क हेल्थकेअरचे प्रमुख वैद्यकीय व्यवहार प्रमुख) यांच्या मते, "हार्मोन थेरपीमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेले थायरॉक्सिन (T4)सारखे हार्मोन्स देऊन शरीरातील हार्मोन्सची कमतरता भरून काढली जाते."

Levothyroxine हे औषध सर्वाधिक प्रचलित असून ते थायरॉईड हार्मोनची कमतरता भरून काढते आणि शरीराच्या कार्यांना पूर्वपदावस्थित करते. यामुळे थकवा, वजन वाढणे, आणि नैराश्य यासारखी लक्षणे कमी होतात.

उपचार सुरू करताना सुरुवातीला कमी डोस दिला जातो आणि नंतर नियमित तपासणी करून TSH (थायरॉईड उत्तेजक हार्मोन) च्या पातळीच्या आधारे डोस समायोजित केला जातो.

फक्त हायपोथायरॉईडीझम वरच नव्हे तर हार्मोन अतिरिक्त तयार होणार्‍या हायपरथायरॉईडीझम वरही हा उपचार फायदेशीर ठरतो. अशा स्थितीत हार्मोन उत्पादन कमी करणारी औषधे आणि लक्षणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीटा-ब्लॉकर्स दिली जाऊ शकतात.

डॉ. चौधरी यांनी हेही स्पष्ट केले की, "हार्मोन थेरपीमुळे हृदयविकार आणि स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या थायरॉईडच्या आजाराच्या गुंतागुंता टाळण्यास मदत होते."

त्यामुळे थायरॉईडच्या समस्येने त्रस्त असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती हार्मोन थेरपी आणि नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT