Exercise Sakal
आरोग्य

Exercise and Health: व्यायाम करणं बंद केल्याचं शरीराला कधी कळतं? शरीरात बदल कसे घडतात?

तुम्ही विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही व्यायाम करणं, जिम करणं सोडता त्यावेळी तुमच्या शरीराला याची जाणीव कधी होते?

वैष्णवी कारंजकर

फिट राहण्यासाठी अनेकजण व्यायाम करतात. पण खूप कमी लोक असे आहेत जे व्यायामात सातत्य राखू शकतात आणि वर्षानुवर्षे व्यायाम करत राहतात. बहुतांश लोक काही वेळासाठी व्यायाम करतात आणि मग सोडून देतात. पण तुम्ही विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही व्यायाम करणं, जिम करणं सोडता त्यावेळी तुमच्या शरीराला याची जाणीव कधी होते?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही दीर्घकाळ व्यायाम करून अचानक व्यायाम करणं सोडून देता, तेव्हा शरीराला लगेचच त्याची जाणीव होत नाही. त्यामुळे वर्कआऊट सोडल्यावर लगेचच तुमच्या शरीरामध्ये फार मोठे बदल होणार नाहीत. शरीराचा आकार बिघडण्यासाठी काही वेळ लागतो. पण तुम्हाला माहित आहे का की शरीरात असे बदल का घडतात? हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी शरीराला आकार कसा येतो, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

शरीरामध्ये बदल कसा घडतो?

फिटनेस एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, शरीरामध्ये होणारे बदल हे सर्वात शेवटी केलेल्या व्यायामावर अवलंबून असतात. व्यायामामुळे शरीरा ग्रोथ मोडमध्ये जातं. यामध्ये शरीरा पहिल्यांदा व्यायाम करण्यासाठी वापरल्या गेलेल्या सगळ्या ऊर्जेला रिप्लेस करण्याचा प्रयत्न करतं. त्यानंतर ते स्नायूंची पुनर्निर्मिती करतं. यामध्ये हृदय आणि रक्त वाहिन्यांच्या स्नायूंचाही समावेश आहे. व्यायामामुळे स्नायू नियमितपणे होणाऱ्या आपल्या कार्यासाठी अधिक चांगले होतात.

व्यायामाचा शरीरावर होणारा परिणाम

तज्ज्ञ सांगतात की एकाच पद्धतीचा व्यायाम कमीत कमी तीन दिवसांच्या अंतराने करायला हवा. म्हणजे शरीराच्या कोणत्याही एका भागाचा व्यायाम तीन दिवसांनंतरच करायला हवा. दररोज प्रत्येक प्रकारचा व्यायाम केल्याने स्नायूंना नुकसान होऊ शकतं. परंतु, वर्कआऊट आणि आपल्या क्षमतेवर हे अवलंबून असतं.

स्नायू जेव्हा नुकसान झाल्यावर पुन्हा व्यवस्थित होतात, तेव्हासुद्धा काही गोष्टी बिघडू शकतात. वर्कआऊट केल्यावर शरीर ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी स्वतःचे वेगवेगळे मार्ग शोधतं. त्यामुळेच जेव्हा तुम्ही व्यायाम करणं सोडून देता, तेव्हा त्याचा शरीरावर परिणाम होतो.

टीप – वरील माहितीच्या आधारे कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT