Egg sakal
आरोग्य

Diabetes and Egg: अंडी खाल्ल्याने डायबिटीजचा धोका वाढतो का? जाणून घ्या याबाबतचं सत्य

अंडी खाण्याची आवड अनेकांना आहे. पण याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

Aishwarya Musale

अंडी ही अशी गोष्ट आहे की बहुतेक लोकांना नाश्त्यात खायला आवडते, परंतु एका नवीन अभ्यासानुसार, जास्त अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. संशोधकांच्या मते, जे लोक दररोज एक किंवा अधिक अंडी खातात, म्हणजे सुमारे 50 ग्रॅम, त्यांना मधुमेहाचा धोका 60 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. त्याचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर अधिक दिसून आला.

अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका

हा अभ्यास दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाने चायना मेडिकल युनिव्हर्सिटी आणि कतार युनिव्हर्सिटीच्या भागीदारीत केला आहे. हा Longitudinal Study 1991 ते 2009 या कालावधीत करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम अंडी खाल्ल्याने चीनमधील लोकांवर काय परिणाम होतो यावर अभ्यास करण्यात आला.

यामध्ये मोठ्या संख्येने प्रौढांचा सहभाग होता. एपिडेमियोलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ मिंग ली म्हणतात की जर तुम्हाला टाइप-2 मधुमेह असेल तर त्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो, त्यामुळे आहारातील कोणत्या घटकांमुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते हे समजून घेणे आवश्यक आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आहारात धान्य आणि भाज्या सोडून, प्रोसेस्ड डायट, अन्नामध्ये मांसाहारी गोष्टींचे प्रमाण जास्त असणे, स्नॅक्स आणि ऊर्जायुक्त पदार्थ खाणे यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

या गोष्टींसोबतच आजकाल अंड्यांचे सेवनही वाढले आहे, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.चीनमध्ये झालेल्या या सर्वेक्षणानुसार, गेल्या दशकात अंडी खाणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. हा अभ्यास ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अंडी खाणे आणि मधुमेहाचा धोका वाढवणे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या अभ्यासात अंडी जास्त काळ खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, जे लोक दररोज सरासरी 38 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी खातात त्यांना मधुमेहाचा धोका 25 टक्क्यांनी वाढतो. दुसरीकडे, जे लोक 50 ग्रॅमपेक्षा जास्त अंडी खातात किंवा दिवसातून एक किंवा अधिक अंडी खातात त्यांना मधुमेह होण्याचा धोका 60 टक्क्यांनी वाढतो.

या निकालानुसार, अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की अंड्याचे सेवन आणि मधुमेह यांचा काय संबंध आहे आणि असे का होते यावर अधिक संशोधन आवश्यक आहे. China Health and Nutrition Survey मध्ये 8545 प्रौढांचा समावेश करण्यात आला. सर्वेक्षणात सहभागी लोकांचे सरासरी वय 50 वर्षे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT