how many times you drink coffee.. know its disadvantages सकाळ
आरोग्य

कॉफी पिणं पडू शकतं महागात; Heart Attack येण्याचा धोका

जास्त कॉफी पित असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेक जणांना चहापेक्षा कॉफी पिणे खुप आवडते कारण कॉफी ही माणसाला फ्रेश ठेवते पण म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक माणसाला विनाशाकडे नेतं. हे खरंय. दिवसातून दोनदा कॉफी पिणे योग्य आहे पण जर तुम्ही त्यापेक्षा अति जास्त कॉफी पित असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यातील काही दुष्परिणाम देखील आहेत. कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या आरोग्यासाठी इजा पोहचवतात. त्यातील काही महत्त्वाचे दुष्परिणाम आज आपण जाणून घेणार आहोत. (how many times you drink coffee? know its disadvantages)

झोप न येणे-

कॉफी ही झोप पळवण्यात खुप प्रभावित आहे. कॉफीमध्ये आपली झोप किंवा सुस्ती नष्ट करण्याची ताकद आहे. परंतु जास्त प्रमाणात कॉफी सेवन केल्याने योग्य झोप होत नाही आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर परीणाम होतो.

चिडचिड किंवा अस्वस्थता जाणवणे -

कॉफीचे जास्त सेवन केल्याने काही लोकांना चिडचिड किंवा अस्वस्थता जाणवू शकते. कॉफी काही लोकांसाठी ऊर्जा बूस्टर असू शकते परंतु ज्यांना एंग्जाइटीचा त्रास असतो त्यांनी कॉफी जास्त न घेणेच बरे.

हार्मोनल बदल -

कॉफीमध्ये असणारी कॅफीन माणसाच्या शरीरात अनेक बदल घडवून आणते. यामुळे हार्मोनल बरेच होतात. सोबतच इस्ट्रोजेनच्या पातळीत बदल झाल्याने स्त्रियांना धोका निर्माण होतो.

हृदयविकाराचा धोका वाढतो -

दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील एका अभ्यासानुसार जे लोक दररोज अति जास्त कॉफी पितात त्यांच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. हृदयविकाराचा धोका वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 2nd T20I Live: अभिषेक शर्मा एकटा भिडला! सूर्या, गिल, संजू फेल झाले असताना हर्षित राणा फलंदाजीत चमकला

Smart Anganwadi Kit: डिजिटल चालना; १६१ अंगणवाड्यांना स्मार्ट कि, प्रत्येकी १ लाख ६४ हजार ५६० रुपयांचा निधी, सुधारणेतील मोठा टप्पा

Latest Marathi News Live Update : सोयाबीनची नोंदणी सुरू होताच सर्वर डाऊनचा शेतकऱ्यांना फटका

'रोहित आर्यनं कालच आर.ए. स्टुडिओ स्टुडिओत बोलावलं होतं' मराठी अभिनेत्रीने सांगितलं, 'त्याने मला लोकेशन सुद्धा पाठवलेलं पण...'

Undri Traffic : उंड्रीत अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी; नागरिकांची डोकेदुखी वाढली

SCROLL FOR NEXT