Vitamin D  esakal
आरोग्य

Vitamin D : शरीरात किती प्रमाणात असते व्हिटॅमिन डी ची गरज, सप्लिमेंट्स कधी घ्यावेत? इथे वाचा सविस्तर

शरीरात गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डीची मात्रा झाल्यास हायपरव्हिटामिनोसिस होतो

साक्षी राऊत

Vitamin D : निरोगी आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी फार गरजेचे असते. हे एक असे व्हिटॅमिन आहे जे नैसर्गिकरित्या मिळते. सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डी चा मुख्य स्त्रोत असतो. याशिवाय काही पदार्थांतूनही व्हिटॅमिन डी मिळते. काही लोक हाडांचे दुखणे सुरु होताच व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात करतात. मात्र सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी हे माहिती असणे गरजेचे आहे की, शरीरात किती व्हिटॅमिन डी ची गरज असते. शरीरात गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन डीची मात्रा झाल्यास हायपरव्हिटामिनोसिस होतो. ज्यामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण जास्त होते जे शरीरासाठी घातक ठरू शकते.

शरीराला किती व्हिटॅमिन डी ची गरज असते?

एक वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतच्या लोकांमध्ये ६०० आईयू व्हिटॅमिन डी ची गरज असते. तर साठ वर्षांवरील लोकांमध्ये ८०० आईयू व्हिटॅमिनची गरज असते. तर एक वर्षांपेक्षा लहान मुलांना रोज ४०० इंटरनॅशनल यूनिट व्हिटॅमिन डी ची गरज असते.

शरीरात व्हिटॅमिन डी गरजेपेक्षा जास्त झाल्यास...

  • व्हिटॅमिन डी हे विरघळणारे व्हिटॅमिन असून ते शरीरात जास्त प्रमाणात झाल्यास पाण्यासह शरीरातून बाहेर पडत नाही. आणि शरीरात साचण्यास सुरुवात होते. त्यामुळे व्हिटॅमिन डी चे प्रमाण शरीरात जास्त झाल्यास अनेक समस्या उद्भवतात.

  • व्हिटॅमिन डी शरीरात जास्त झाल्यास कॅल्शियनचे प्रमाण वाढते.

  • व्हिटॅमिन डी शरीरात जास्त झाल्यास किडनीवर प्रेशर पडते. ज्यामुळे किडनी फेल होण्याचा धोका वाढतो. याशिवाय व्हिटॅमिन डी मुळे डायरिया, डायजेशनच्या समस्याही उद्भवतात.

व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता झाल्यास या समस्या उद्भवतात

हाडांचे दुखणे

मांसपेशींचे दुखणे

थकवा जाणवणे

हाडांमध्ये फ्रॅक्चर

हेयरफॉल

कमकुवत इम्युनिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT