Reading Benefits esakal
आरोग्य

Reading Benefits : वाचनाची सवय तुमचे मानसिक आरोग्य आणि आयुर्मान देखील वाढवते, जाणून घ्या ‘हे’ फायदे

वाचनाच्या सवयीमुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Monika Lonkar –Kumbhar

Reading Benefits : वाचन केल्याने आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. हे तर आपण सर्वांनी ऐकले असेल. मात्र, वाचन केल्याने आपले मानसिक आरोग्य देखील सुधारते, यामुळे, तुम्हाला आराम मिळतो.

जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा वाचताना काही लोक रडायला आणि काही लोक हसायला लागतात. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, एखादी कथा वाचत असताना आपण तिथल्या जीवनाची, वातावरणाची कल्पना करू लागतो.

पुस्तकातील कथेच्या नायकाने काही चांगले केले तर आपण स्वत: ते चांगल कार्य केल्याची कल्पना करू लागतो. खरं तर ही भावना आपल्याला तणावापासून मुक्त करते. त्यामुळे, आपल्या मेंदूचे कार्य आणि आयुर्मान वाढण्यास मदत होते. वाचनाच्या सवयीमुळे आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. आज आपण वाचनाचे फायदे कोणते? ते जाणून घेऊयात.

तणावापासून मिळतो आराम

पुस्तकांचे वाचन केल्याने तुम्हाला तणावापासून आराम मिळू शकतो. तसेच, यामुळे तुमच्या स्नायूंना देखील आराम मिळू शकतो. पुस्तक वाचत असताना आपल्या मनात त्या पुस्तकातील कथेप्रमाणे किंवा कथानकाप्रमाणे व्हिज्युएल्स तयार होतात.

त्यामुळे, त्या कथेत आपले मन रमून जाते, आपण त्या पुस्तकात इतके मग्न होतो की, आपण ताण-तणाव विसरून जातो. थोडक्यात पुस्तकाचे वाचन केल्यावर तुमच्या मनातील तणाव दूर राहण्यास मदत होते आणि तुमचे मन आनंदी होते.

मेंदूचे आरोग्य वाढते

पुस्तक वाचणे हे आपल्या मेंदूसाठी एखाद्या सुपरफूड प्रमाणे आहे. त्यामुळे, पुस्तकांचे वाचन केल्याने मेंदूचे आरोग्य वाढण्यास मदत होते. संशोधनातून असे समोर आले आहे की, पुस्तकांचे वाचन केल्याने मेंदूची क्रिया, स्मरणशक्ती आणि संज्ञात्मक कार्य वाढण्यास मदत होते.

यामुळे, आपली सर्जनशीलता देखील वाढू शकते. पुस्तकांचे वाचन केल्याने मेंदूला होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये देखील परिवर्तन दिसून येते. त्यामुळे, पुस्तकांचे जरूर वाचन करा आणि तुमच्या मेंदूचे आरोग्य वाढवा.

झोप चांगली होते

वाचन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. वाचन केल्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते. वाचन करत असताना आपले मन आणि मेंदू त्या पुस्तकात हरवून जाते. त्यामुळे, आपण ताण-तणाव विसरून जातो. त्यामुळे, ताण-तणाव दूर होऊन झोप चांगली येण्यास मदत होते.

झोपेचे कार्य सुधारल्यामुळे आपले आरोग्य ही चांगले राहते आणि ताण-तणावापासून मुक्ती मिळते. यामुळे, मानसिक आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT