Hair Care Sakal
आरोग्य

Winter Hair Care : हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी

बदलत्या ऋतूनुसार केसांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचे असते.

सकाळ डिजिटल टीम

Winter Hair Care : बदलत्या ऋतूनुसार केसांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचे असते. खासकरून हिवाळ्यात. थंडीमुळे केस रूक्ष होणे, डोक्यामध्ये खाज येणे, केस गळणे, केस तुटणे. अशा अनेक समस्यानां सामोरे जावे लागते. थंडीत केसांची जास्त निगा ठेवाण्याची गरज असते. अशावेळी पुढील टिप्स फॅालो करा.

hair

1) तेलाने करा केसांची मसाज

हिवाळ्यात केसांना कोमट गरम तेलाने मसाज करणे फायदेशीर मानले जाते. यामुळे केस मऊ होतात. तेलाने केसांना पोषण मिळते. यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल, नारळ किंवा बदाम तेलासोबत प्रत्येकी 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि एलोवेरा जेल घाला. या तेलाने टाळूची मसाज केल्यास रक्ताभिसरण वाढते आणि केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. एवढेच नव्हे तर, शांत झोप लागते.

2) असे धुवा केस

कोंड्याची समस्या टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा केसं धुवावेत. केसं धुण्यासाठी डबल कन्डिश्निंग मेथड वापरावी. हे करताना केसांना कंडिश्नंग करून पाच ते दहा मिनिटे ठेवून केसं धुवून घ्यावेत. त्यानंतर शॅम्पूने केसं धुवावे आणि पुन्हा कंडिश्निंग करावे. यामुळे केस मुलायम होतील. हिवाळ्यात केस गरम किंवा कडक पाण्याने न धुता कोमट पाण्याने धुवावेत.

hair wash

3) केस कसे वाळवाल

ओले केस नैसर्गिकरित्या वाळवावे. केस वाळवण्यासाठी ड्रायर किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर टाळावा. यामुळे केसांचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते. त्याऐवजी केस वाळवण्यासाठी तुम्ही हलक्या हाताने वाळवा. एवढेच नव्हे तर, टॉवेलने केस झटकून वाळवणे टाळा. एकदा केस पूर्णपणे वाळले की त्याला हेअर सिरम लावण्यास विसरू नका.

4) असे विंचरा केस

केस विंचरण्यासाठी साध्या फणीऐवजी पॅडल कुशन हेअर ब्रशचा वापर करा. केसांमधील गुंता काढताना केसांच्या शेंड्यापासून सुरूवात करून मुळापर्यंत जावे. याने केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. केस विंचरताना हलक्या हाताने विंचरावे.

5) केस मोकळे सोडणे टाळा

केस मोकळे सोडू नका. त्यामुळे केसांची आर्द्रता कमी होते. कुठेही बाहेर जाताना केसं स्कार्फने कव्हर करा, धुतलेले ओले केस घट्ट बांधण्याची चूक करू नका. हिवाळ्यात केसांमध्ये जास्त प्रमाणात स्प्लिटस पडतात. त्यामुळे अधून-मधून केसांना ट्रिम करत राहा. म्हणजे केस हेल्दी राहण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT