Benefits of Dhanurasana  esakal
आरोग्य

Benefits of Dhanurasana : स्ट्रेचिंगसाठी आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे धनुरासन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

Benefits of Dhanurasana : शरीराच्या उत्तम स्ट्रेचिंगसाठी आणि वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी हे योगासन लाभदायी ठरते.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Dhanurasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी नियमित योगाभ्यासाची सवय ही अत्यंत फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे, तुमच्या दिनचर्येत संतुलित आहारासोबतच योगाचा ही समावेश करा. योगासनांमध्ये विविध प्रकारच्या आसनांचा समावेश आहे. या आसनांच्या नियमित सरावामुळे विविध समस्यांपासून आराम मिळू शकतो.

या योगासनांपैकी एक असलेले धनुरासन हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. शरीराच्या उत्तम स्ट्रेचिंगसाठी आणि वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी हे योगासन लाभदायी ठरते.

धनुरासन हे योगासन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेष म्हणजे हठयोगामध्ये वर्णन केलेल्या १२ आसनांपैकी हे एक योगासन आहे. हा एक संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ ‘धनुष्याची मुद्रा’ असा होतो. आज आपण हे धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

धनुरासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • धनुरासन हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. परंतु, याचा सराव करण्यासाठी तुमची चांगली एकाग्रता आणि शारिरीक संतुलन असणे आवश्यक आहे.

  • हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पोटावर झोपा.

  • आता तुमचे दोन्ही हात पायांच्या जवळ ठेवा. त्यानंतर, तुमचे दोन्ही गुडघे वाकवून ते धरण्याचा प्रयत्न करा.

  • आता दीर्घ श्वास घेताना तुमची छाती वरच्या दिशेने उचला आणि हातांनी पाय ओढा.

  • या स्थितीमध्ये तुमच्या श्वासाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करा.

  • २०-२२ सेकंद या स्थितीमध्ये रहा. आता तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल.

  • त्यानंतर, सामान्य स्थितीमध्ये या.

धनुरासन करण्याचे फायदे

  • धनुरासन या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने मानेचा ताण कमी होतो. यासोबतच मान आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरते.

  • दररोज हे योगासन केल्याने तुमच्या पायाचे घोटे, मांड्या, छाती, मान आणि खांद्याची ताकद सुधारते.

  • या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने पायांचे स्नायू मजबूत होतात.

  • श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरते.

  • पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी हे योगासन उपयुक्त आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT