Benefits Of Pawanmuktasan esakal
आरोग्य

Benefits Of Pawanmuktasan : हातांच्या आणि पायांच्या मजबूतीसाठी फायदेशीर आहे पवनमुक्तासन, जाणून घ्या पद्धत अन् फायदे

Benefits Of Pawanmuktasan : दैनंदिन जीवनामध्ये नियमित योगा आणि संतुलित आहाराचा समावेश असणे, हे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Pawanmuktasan : दैनंदिन जीवनामध्ये नियमित योगा आणि संतुलित आहाराचा समावेश असणे, हे आरोग्यासाठी आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीसाठी या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. योगामुळे आपले शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. योगासनांमध्ये विविध प्रकारच्या योगासनांचा समावेश होतो.

या योगासनांपैकीच एक असलेले योगासन म्हणजे पवनमुक्तासन होय. नियमितपणे हे योगासन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खास करून पोटाच्या उपचारांसाठी हे योगासन ओळखले जाते. या योगासनाच्या नियमित सरावामुळे पोटातील गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. शिवाय, सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन लाभदायी आहे. आज आपण पवनमुक्तासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेणार आहोत.

पवनमुक्तासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • पवनमुक्तासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठीवर झोपा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही पाय सरळ करा.

  • आता तुमचा उजवा गुडघा हा छातीजवळ आणा आणि मांडी पोटापर्यंत आणा.

  • आता तुमच्या गालाला किंवा हनुवटीला गुडघ्याने स्पर्श करा.

  • त्यानंतर, दीर्घ श्वास घेताना तुमचा गुडघा हाताने घट्ट धरा. या स्थितीमध्ये तुम्हाला शरीरात ताण जाणवेल, जे की सामान्य आहे.

  • आता श्वास सोडा आणि तुमचे गुडघे मोकळे करा आणि सामान्य स्थितीमध्ये या.  

  • ही संपूर्ण प्रक्रिया डाव्या पायाने केल्यानंतर आता ही अशीच प्रक्रिया उजव्या पायाने करा.

पवनमुक्तासनाचे फायदे

  • पवनमुक्तासनाचा नियमित सराव केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात.

  • दररोज हे योगासन केल्याने हात आणि पाय मजबूत होतात.

  • या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने वजन कमी करण्यास ही मदत होते.

  • पवनमुक्तासनाचा दररोज सराव केल्याने सर्दीच्या समस्येपासून आराम मिळतो. परंतु, सर्दी झालेली असताना हे योगासन करताना श्वासोच्छवासाची विशेष काळजी घ्यायला विसरू नका.

  • हे योगासन नियमितपणे केल्याने पोटातील गॅसची समस्या, बद्धकोष्ठता, पोट जड होणे, पोट दुखणे इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय पचनक्रिया सुधारते.

  • या योगासनाच्या सरावामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT