Benefits Of Sukhasana esakal
आरोग्य

Benefits Of Sukhasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर सुखासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

Benefits Of Sukhasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Sukhasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे. आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांचा आधार घेऊ शकता. फक्त यासाठी योगासनांचा दररोज सराव करणे महत्वाचे आहे. जर तुम्ही योगा कधी केला नसेल, तर सुरूवातीला सोप्या आसनांचा सराव करा.

या सोप्या आसनांपैकी एक असलेले योगासन म्हणजे सुखासन होय. सुखासनाला साधे सोपे योगासन असे ही म्हटले जाते. सुखासन म्हणजे आरामात बसणे होय. सुखासन हे योगासन कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने गुडघे आणि घोट्यांवर ताण येतो आणि पाठीला बळकटी मिळते. चला तर मग जाणून घेऊयात सुखासन करण्याची योग्य पद्धत अन् फायदे.

सुखासन करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सुखासन हे योगासन करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाय पसरून बसा.

  • या दरम्यान पाठीचा कणा ताठ असायला हवा.

  • आता तुमच्या पायांचे दोन्ही गुडघे एकमेकांमध्ये गुंतवा. या स्थितीमध्ये तुमचे दोन्ही गुडघे बाहेरच्या बाजूला असायला हवेत.

  • आता तुमच्या दोन्ही पायांना आरामदायक वाटेल अशा स्थितीमध्ये ताठ बसा.

  • या स्थितीमध्ये तुमची पाठ, मान आणि डोके सरळ रेषेत आणि ताठ असायला हवेत.

  • आता डोळे बंद करून दीर्घश्वास घ्या आणि काही मिनिटे याच स्थितीमध्ये राहा.

सुखासन करण्याचे आरोग्यदायी फायदे :

  • या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने शरीर अन् मेंदू शांत आणि स्थिर राहण्यास मदत होते.

  • मानसिक आणि शारिरीक संतुलनासाठी हे योगासन फायदेशीर आहे.

  • या योगासनाचा नियमित सराव केल्याने पाठीचा कणा बळकट होण्यास मदत होते.

  • सुखासनाचा दररोज सराव केल्याने थकवा, तणाव, चिंता आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते.

  • जर तुम्ही दररोज या योगासनाचा सराव केला तर तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील यात काही शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नोएल टाटा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला दिली भेट

Success Story: कठीण परिश्रम आणि चिकाटीचा फळ; यूपीएससीत गोंदियाच्या श्रवण मुंदडा याला २७५ वा रॅंक

Anurag Dobhal: १५० किमी वेगात कारची धडक; लाईव्हमध्येच जीवन संपवण्याचा प्रयत्न? बिग बॉस स्टार अनुराग डोवालचा VIDEO समोर

Beed News: डोळेच काय, माझा मुलगाच घ्या; वडिलांनी घेतला अवयवदानाचा निर्णय, उपस्थितांना आले गहिवरून

SCROLL FOR NEXT