Get Rid Of Acidity sakal
आरोग्य

Get Rid Of Acidity : तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होतो? मग हे घरगुती उपाय एकदा ट्राय कराच

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

अनेक लोकांना वारंवार पित्ताचा त्रास होत असतो. अत्याधिक पित्ताच्या त्रासामुळे शरीरात जागोजागी सूज येणे, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब, जळजळणे, पोट झाडणे, त्वचेवर फोड, चट्टे उठणे,अनिवार इच्छा उठणे असे लक्षणे दिसून येतात.

यासाठी अनेकदा डॉक्टरांकडे जाऊनही काहीही फायदा होत नाही. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (how to get rid of acidity read story)

पित्त कशामुळे होते

पित्ताचा त्रास हा तिखट, आंबट, खारट, मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि लाल मांस, कॉफी, ब्लॅक टी, निकोटीन (धुम्रपान), अल्कोहोल आणि इतर मादक पदार्थ, उन्हात सतत वास्तव्य, भावनिक ताण, अतिश्रम किंवा/आणि अतिआळस यामुळे होऊ शकतं.

योग्य आहाराचे सेवन करा

पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांनी आहाराचे सेवन करावे. कडवट, तुरट, मधुर चवीचा आहार घ्यावा. दुध, तूप, लोणी हे उत्तमरीत्या पित्ताचे शमन करतात. आंबट फळांऐवजी गोड फळे खावे. मध आणि काकवी सोडून बाकी गोड वस्तूंचाही तुम्ही वापर करू शकता.

योग्य आरामाची वेळ

कार्यशीलता आणि विश्रांती ह्यात योग्य समन्वय साधा. कामातच फार गुंतून राहू नका किंवा खूप लोळणे टाळा.

चांगल्या गोष्टींचा आस्वाद घ्या

नियमित आहार घ्या आणि चांगल्या संगतीत आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा.

ध्यान करा

ध्यान करा आणि आपल्या पित्त प्रकृतीच्या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करा. त

मुख्य योगासने

मार्जारासन​, शिशू आसन, चंद्र नमस्कार, उत्कटासन, भुजंगासन, विपरीत शलभासन, पश्चीमोत्तानासन, अर्धनौकासन, अर्धसर्वांगासन, सेतूबंधासन, शवासन, योगिक श्वास करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT